विशाल कदम
Uruli Kanchan Crime : लोणी काळभोर : लग्नासाठी नवरदेवाला वाजतगाजत घेऊन जात असताना बोरीभडक (ता. दौंड) येथे साउंड सिस्टीमवरून वाद झाल्याची घटना सोमवारी (ता.२९) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर विनापरवाना डीजे वाजविल्याप्रकरणी वरबापासह डीजे मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोणी काळभोर, उरुळी कांचन व बोरीभडक येथील चौघांवर यवत पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. (Stones thrown at DJ at Boribhadak; A case has been registered against four)
दगडफ़ेक केल्याबद्दल दोघांवर तर विनापरवाना डीजे वाजविल्याबद्दल अन्य दोघांवर गुन्हा दाखल
याप्रकरणी व्यावसायिक जुबेर रज्जाक तांबोळी (वय २४, रा. लोणी काळभोर, ता.हवेली, जि. पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चंद्रकांत बबन खेडेकर (रा. खेडेकर मळा, उरुळी कांचन, ता. हवेली, जि. पुणे) आणि दिलीप दत्तात्रय काळे (रा.बोरीभडक ता.दौंड, जि.पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Uruli Kanchan News) तर उमेश सोपान गायकवाड (पोलीस अंमलदार, यवत पोलीस ठाणे) यांनी सरकारच्या वतीने दिलेल्या फिर्यादीनुसार विनापरवाना डीजे वाजविल्याप्रकरणी डीजे मालक जुबेर रज्जाक तांबोळी (वय २४, रा. लोणी काळभोर, ता.हवेली, जि. पुणे) व वरबाप मल्हारी सोनबा कोपनर (रा. बोरीभडक ता. दौंड, जि. पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत शेंडगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणी काळभोर येथील रज्जाक तांबोळी यांचा डीजेचा व्यावसाय आहे. (Uruli Kanchan News) तर बोरीभडक (ता. दौंड) येथील मल्हारी कोपनर यांचा मुलगा अनिकेतचे लग्न सोमवारी (ता.२९) ठरले होते. तर तांबोळी यांनी मल्हारी कोपनर यांच्या मुलाच्या लग्नाची सुपारी घेतली होती.
दरम्यान, बोरीभडक येथून नवरदेवाला उरुळी कांचन येथील मंगल कार्यालयाकडे सोमवारी दुपारच्या सुमारास वाजत गाजत घेऊन जात असताना, आरोपी चंद्रकांत खेडेकर व दिलीप काळे यांनी मोटारसायकल डीजेला आडवी लावली. (Uruli Kanchan News) त्यानंतर डीजेवर दगडफेक करुन शिवीगाळ केली. अशी फिर्याद तांबोळी यांनी दिली आहे. त्यानुसार यवत पोलीस ठाण्यात डीजेमालक व वरबापावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सार्वजनिक ठिकाणी बेकायदेशीर डी. जे मोठया आवाजात वाजवुन शांततेचा भंग केल्याप्रकरणी दोन्ही आरोपींच्या विरोधात यवत पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक उमेष गायकवाड यांनी फिर्याद दिली आहे. (Uruli Kanchan News) त्यानुसार आरोपी जुबेर तांबोळी व मल्हारी कोपनर यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुढील तपास यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार गणेश कर्चे करीत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :