जनार्दन दांडगे
Uruli Kanchan News : : उरुळी कांचन, (पुणे) : राज्य शासनाकडून दरमहा लाखो रुपयांचा पगार घेणारे दोन वैद्यकीय आरोग्य अधिकारी (डॉक्टर) असूनही, उरुळी कांचन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात येणाऱ्या सर्वसामान्य नागरीकांना तालुक्यातील इतर प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या तुलनेत दहा टक्केही आरोग्य सेवा मिळत नसल्याच्या तक्रारी पुढे आलेल्या आहेत.(Despite two doctors earning lakhs of rupees per month, the primary health center at Uruli Kanchan is ‘not a problem but a hindrance’ in the eyes of the general public.)
राजकीय नेत्यांच्या दुर्लक्षामुळे शवविच्छेदन केंद्र दीड वर्षापासून बंदच
उरुळी कांचन, लोणी काळभोरसह पूर्व हवेलीमधील नागरीकांच्या सोईसाठी उभारण्यात आलेले शवविच्छेदनगृह, दोन डॉक्टरांच्या वादात मागील दीड वर्षापासून बंद असल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे.
राज्य शासनाकडून दरमहा लाखो रुपयांचा पगार घेणाऱ्यांपैकी एक डॉक्टर शवविच्छेदनाचे काम टाळण्यासाठी सतत रडतोय तर, दुसरा पहिला डॉक्टर टाळतोय मग मी का ते काम करु असे म्हणत दुसरा डॉक्टर रडण्याचे नाटक करतोय अशी अवस्था उरुळी कांचन प्राथमिक आरोग्य केंद्राची झालेली आहे. (Uruli Kanchan News) मात्र या दोघा डॉक्टरांच्या रडारडीच्या नौटंकीत, पूर्व हवेलीमधील लाखभर लोकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. उरुळी कांचन व परीसरात गल्लीपासून दिल्लीपर्यंत ‘वठ’ असणारे नेते असताना, त्यांच्या बुडाखाली आरोग्यसेवा कोलमडल्याची खंत निर्माण झाली आहे.
उरुळी कांचन, लोणी काळभोरसह पूर्व हवेलीमधील सोळाहून अधिक गावांसाठी शिरुर-हवेलीचे कार्यसम्राट आमदार अशोक पवार व जिल्हा नियोजन समितीचे तत्कालीन सदस्य संतोष कांचन यांच्या प्रयत्नामुळे दीड वर्षापूर्वी उरुळी कांचन प्राथमिक आरोग्य केंद्रात मोठे गाजत-वाजत शवविच्छेदन केंद्र सुरु केले होते. मात्र उद्घाटनानंतर तब्बल वर्षभर उरुळी कांचन येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दोन्ही वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अडेलतट्टूपणाच्या भूमिकेमुळे केंद्र सुरुच होऊ शकले नव्हते. (Uruli Kanchan News) सहा महिन्यांपूर्वी पत्रकारांनी याबाबत आवाज उठवताच, पत्रकारांची तोंडे बंद करण्यासाठी शवविच्छेदन सुरु करण्याचे नाटक करण्यात आले. कार्यसम्राट खासदार, आमदार , गल्लीपासून दिल्लीपर्यंत ‘वठ’ असणारे नेते बडे नेते पूर्व हवेलीत असतानाही, उरुळी कांचन प्राथमिक आरोग्य केंद्रात काम करणाऱ्या दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांनी संबधितांना शेंडी लावल्याचे पुढे आहे.
उरुळी कांचनपासून दहा किलोमिटर अंतरावर असलेल्या लोणी काळभोर प्राथमिक आरोग्य केंद्रात सर्वसामान्य नागरीकांना सर्व प्रकारच्या वैद्यकीय सेवा मिळत असताना, उरुळी कांचन प्राथमिक आरोग्य केंद्रात मात्र आरोग्यसेवा मिळण्यात अडचणी येत असल्याचा आरोप नागरीकांच्याकडून केला जात आहे. (Uruli Kanchan News) सर्वसामान्य नागरीकांना चागली आरोग्य सेवा मिळावी यासाठी राज्य शासन महिन्याकाठी पन्नास लाख रुपयांहून अधिक रक्कम उरुळी कांचन प्राथमिक आरोग्य केंद्रावर खर्च करत असताना, येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दोन्ही वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अडेलतट्टूपणाच्या भूमिकेमुळे सर्वसामान्य नागरीक आरोग्य सेवेपासुन वंचित राहत असल्याचे दिसून येत आहे. जिल्हा परिषदेकडून येणारी अनेक औषधेही परस्पर गायब होत असल्याचा गंभीर प्रकारही उरुळी कांचन प्राथमिक आरोग्य केंद्रात घडत असल्याचा आरोप एका माजी लोकप्रतीनिधीने केला आहे. याही प्रकरणाची ही सखोल चौकशी होण्याची गरज आहे.
तीनही वैद्यकीय अधिकारी संगनमताने एकाचवेळी गैरहजर, कारवाई होणार का?
दरम्यान उरुळी कांचन प्राथमिक आरोग्य केंद्रात नेमणुकीस असलेले दोन वैद्यकीय अधिकारी (डॉक्टर) वरिष्ठ पातळीवरुन रितसर रजा मंजूर न करताच, बेकायदा गैरहजर असल्याचा धक्कायदायक मंगळवारी घडला आहे. (Uruli Kanchan News) प्राथमिक आरोग्य केंद्रातील महिला डॉ. सुचिता कदम या त्यांचे प्राथमिक आरोग्य केंद्रातील दुसरे सहकारी डॉ. संदीप सोनवणे यांच्याक़डे चार्ज देऊन रजेवर गेल्या होत्या. डॉ. सुचिता कदम रजेवर गेल्याने, सोनवणे यांनी प्राथमिक केंद्रात हजर राहणे आवश्यक असताना डॉ. सोनवणे वाडेबोल्हाईच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. नम्रता नंदे यांच्याकडे चार्ज देऊन गायब झाले होते. डॉ. सुचिता कदम, डॉ. संदीप सोनवणे गायब झालेले असचाना, मंगळवारी चार्ज असणारे डॉ. नम्रता नंदे ह्या गायब झाल्या. विशेष बाब म्हणजे डॉ. सुचिता कदम, डॉ. संदीप सोनवणे या दोघांच्याही रजा रितसर मंजूर नसल्याची कबुली वरीष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :