(Uruli Kanchan News) उरुळी कांचन, (पुणे) : महिलाशक्ती महिला एकत्रित आल्या तर कोणतीही समस्या सोडविणे अवघड नसते. त्यामुळे महिलांनी नेहमी आनंदी राहिले पाहिजे. घर मूल न करता न नवीन व्यवसायात लक्ष दिले पाहिजे,असे मत एचएसबीसी सोफ्टवेअर डेव्हलपमेंट कंपनीच्या कार्पोरेट सस्टेनब्लिटीच्या प्रमुख दामिनी खैरे यांनी केले.
शिंदवणे (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील महाडिक फार्म येथे जागतिक महिला दिनानिमित्त बायफ डेव्हलपमेंट फौंडेशन स्थापित दौंड व हवेली तालुक्यातील १० गावातील ११० पेक्षा अधिक महिला स्वयंसहायता बचत गटांचा आनंद मेळाव्यात महिला स्वयंसहायता बचत गटांच्या प्रबोधनांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून खैरे बोलत होत्या. अध्यक्षस्थानी बायफच्या प्रोग्राम व्यवस्थापक राजश्री जोशी होत्या.
यावेळी एचएसबीसी कंपनीचे सेंटर मुख्य अधिकारी गिरीश बिधानी, सिनिअर प्रोजेक्ट व्यवस्थापक पूनम फिरके, बायफ सीएसआर कॅम्पसचे प्रमुख डॉ. जयंत खडसे, बायफचे चीप टीपीई डॉ. मनोजकुमार आवारे, दिपाली कडू, माजी कर्मचारी सुरश शिवतरे, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या वैशाली नागवडे, प्रथम मंडळाचे समन्वयक सचिन कांबळे, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी सुचिता कदम आदी महिला व मान्यवर उपस्थित होते.
डॉ. मणिभाई देसाई यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले व सरस्वती प्रतिमेचे पूजन झाले. ग्रामपंचायत हद्दीतील काळेशिवार परिसरातून गावफेरी काढण्यात आली.
महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष दिले पाहिजे
जोशी म्हणाल्या, “महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष दिले पाहिजे, आजच्या आधुनिक युगात महिलांनी स्वतःच्या पायवर उभे राहून पुरुषांपेक्षा स्त्रिया या कमी नाहीत याची जाणीव करून दिली पाहिजे.”
यावेळी गिरीश बिधानी, डॉ. जयंत खडसे, डॉ. मनोजकुमार आवारे, सुरेश शिवतरे, बचत गटातील सविता कांचन यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले.
दरम्यान, इयता १० वीतील गुणवंत विध्यार्थीचा सत्कार करण्यात आला. बचत गटातील महिलांनी विविध प्रकारे समाजजागृती करणारे सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. आरोग्य विभागामार्फत महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नीता खराडे व स्वरांजली महाडिक यांनी केले. आभार सुमन मोरे यांनी मानले. कार्यक्रम हनुमंत भोसले, मानसिंग कड, विमल थोरात, सागर पारखे व सीएचआरसी स्टाफने परिश्रम घेतले.