Uruli Kanchan News : उरुळी कांचन, (पुणे) : ‘विद्यार्थ्यांमध्ये अलीकडे सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. परंतु कोणतीही अॅप्लिकेशन डाऊनलोड करताना विचार करा. सायबर क्राईम सध्या जोरात आहे. त्यामुळे सावधान राहा. मोबाईलचा वापर फक्त शिक्षणासाठीच करा असे मत लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक शिवशांत खोसे यांनी केले.
विद्यार्थी विकास मंडळ, राष्ट्रीय सेवा योजना व महिला कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन
उरुळी कांचन, (ता. हवेली) येथील महात्मा गांधी सर्वोदय संघ संचलित पद्मश्री मणिभाई देसाई महाविद्यालयात गुरुवारी (ता. १४) विद्यार्थी विकास मंडळ, राष्ट्रीय सेवा योजना व महिला कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने “सायबर सुरक्षा व महिला सुरक्षा” अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. (Uruli Kanchan News) यावेळी या अध्यक्षीय भाषणात खोसे बोलत होते. तर कार्यक्रमाच्या प्रमुख मार्गदर्शक म्हणून अॅडव्होकेट पिंकी राजगुरू उपस्थित होत्या.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाळासाहेब भगत, उपप्राचार्य डॉ. अविनाश बोरकर, प्राध्यापक ज्ञानदेव पिंजारी, रविंद्र मुंढे, डॉ. अमोल बोत्रे, सुजाता गायकवाड, डॉ. कामरून्नीसा शेख, अनुप्रिता भोर, शुभांगी रानवडे, डॉ. अर्चना कुदळे, प्रियांका गोलांडे, रोहित बारवकर, मोरेश्वर बगाडे, विशालदीप महाडिक, महाविद्यालयातील १०२ विद्यार्थी तसेच आदी प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते.
यापुढे बोलताना खोसे म्हणाले, ‘विद्यार्थ्यांनी मोबाईल जवळ आहे म्हणून काहीही सर्च करण्याचा प्रयत्न करू नये. फक्त शाळेच्या व शिक्षणाच्या बाबी पहाव्यात. रिल हिरो व रिअल हिरो यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे.’
दरम्यान, अॅडव्होकेट पिंकी राजगुरू यांनी सर्व विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षा अभियानाचा उद्देश व सायबर सुरक्षा अभियानाचे महत्व समजावून सांगितले. (Uruli Kanchan News) त्याचबरोबर त्यांनी सर्व विद्यार्थीनीना महिला सुरक्षाविषयक कायद्यांची माहिती दिली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व्यसनमुक्ती कक्ष समन्वयक प्रा. विजय कानकाटे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. अमोल बोत्रे यांनी केले. तर आभार महिला कक्ष समन्वयक सुजाता गायकवाड यांनी मानले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Uruli Kanchan News : उरुळी कांचन येथील आखिल तळवाडी मित्रमंडळाची दहीहंडी उत्साहात..