Uruli Kanchan News उरुळी कांचन, (पुणे) : जमिनीच्या वादातून बाप-लेकाने मिळून एका व्यक्तीवर धारदार कटरने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (ता. 07) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास शिंदवणे (ता. हवेली) येथे घडली. या हल्ल्यात संबंधित व्यक्ती गंभीर जखमी झाली असून, भरदिवसा झालेल्या या प्रकारामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.Uruli Kanchan News
मिळालेल्या माहितीनुसार, शिंदवणे ग्रामपंचायत हद्दीत गेल्या काही दिवसांपासून जमिनीवरून दोन गटांत वाद सुरू होता. गुरुवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास हा वाद पुन्हा उफाळून आला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि रागाच्या भरात बाप-लेकाने मिळून समोरच्या व्यक्तीवर धारदार कटरने सपासप वार केले. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. Uruli Kanchan News

हल्ल्यात जखमी झालेली व्यक्ती गंभीर जखमी झाली असून घटनेनंतर स्थानिकांनी तातडीने त्यांना उरुळी कांचन येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. जखमीवर उपचार सुरू आहेत.
सविस्तर वृत्त थोड्याच वेळात…







