Uruli Kanchan News उरुळी कांचन, (पुणे) : डॉ. मणिभाई देसाई यांनी बायफ, निसर्गोपचार आश्रम, महात्मा गांधी सर्वोदय संघ, यशवंत सहकारी साखर कारखाना आदी संस्थांची स्थापना करून ग्रामीण विकासाची पायाभरणी केली. तसेच डॉ. मणिभाई देसाई पतसंस्था जयंतीनिमित्त विविध उपक्रम राबवित असल्याने डॉ. मणिभाई देसाई यांच्या कार्याची माहिती तरूण पिढीला होत असल्याचे मत निसर्गोपचार आश्रमाचे विश्वस्त एन. जी. हेगडे यांनी व्यक्त केले.
भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन…!
उरुळी कांचन (ता. हवेली) चे भाग्यविधाते कर्मयोगी मणिभाई देसाई यांच्या १०३ व्या जयंती निमित्त पतसंस्था व लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन मानिश्रीकृष्ण सहकार संकुल या ठिकाणी करण्यात आले होते. त्याचे उद्घाटन हेगडे यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी हेगडे बोलत होते.
ज्ञानोबा तुळशीराम कांचन, माजी जिल्हा परिषद सदस्या कीर्ती कांचन, सरपंच राजेंद्र बबन कांचन, माजी सरपंच संतोष कांचन, पतसंस्थेचे अध्यक्ष राजेंद्र कांचन, विश्वराज हॉस्पिटलचे डॉ. सुरज इंगोले, ग्रामपंचायत सदस्य अमित कांचन, विविध गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, व मान्यवर उपस्थित होते. सदर रक्तदान शिबीरात १०३ रक्तदात्यांनी सहभाग घेतला व १३० नागरीकांनी मधुमेह तपासणी व मोफत तपासणी शिबीराचा लाभ घेतला. ५२ नागरीकांची मोफत ई. सी. जी., ६० नागरीकांची नेत्र तपासणी, ५० नागरीकांनी हाडांची ठिसुळता तपासणी शिबीराचा लाभ घेतला.
हेगडे म्हणाले…!
“डॉ. मणिभाईनी देसाई यांनी स्थापन केलेल्या संस्थांमधुन लोकोपयोगी कामे आजही सुरु आहेत.” यावेळी लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलचे जनरल व्यवस्थापक डॉ. सुधीर उत्तम यांनी विशेष मार्गदर्शन केले.
दरम्यान, यावेळी संचालक शरद वनारसे, भाऊसाहेब कांचन, कांतीलाल चौधरी, संजय कांचन, संजय टिळेकर, खेमचंद पुरुसवाणी, जीवन शिंदे, अनिकेत वनारसे, सारीका काळभोर, कमल कांचन इ. उपस्थित होते. सुत्रसंचालन संगीता काळे यांनी केले. तर आभार उपाध्यक्ष रामदास चौधरी यांनी मानले. यावेळी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुनील तांबे व ऋषिकेश भोसले यांनी सहकार्य केले.