Uruli Kanchan News : उरुळी कांचन, (पुणे) : उरुळी कांचन येथील बारामती इको सिस्टिम्सचा आधुनिक बायोगॅस सयंत्र कमीत कमी किमतीमध्ये भारतातील प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचावे यासाठी अमुल डेअरीच्या माध्यमातून या प्रकल्पाला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन केंद्रीय वाहतुक व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी दिले आहे. (Bring modern biogas plant of Baramati Eco Systems at Uruli Kanchan to the doorstep of every farmer in India: Nitin Gadkari)
उरुळी कांचन – जेजुरी मार्गावरील शिंदवणे ग्रामपंचायत हद्दीतील बारामती इको सिस्टीम्स या बायोगॅस संयंत्र कंपनीचे अध्यक्ष अभिमन्यु नागवडे बाभुळसर बु (ता. शिरुर) यांनी नुकतीच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची दिल्ली या ठिकाणी त्यांची भेट घेतली. (Uruli Kanchan News) या भेटीत त्यांनी बारामती इको सिस्टिम्सच्या आधुनिक बायोगॅस संयंत्राची माहिती गडकरी यांना दिली यावेळी नितीनजी गडकरी यांनी अभिमन्यु नागवडे यांचे कौतुक करून अमुल डेअरीच्या माध्यमातून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले व संबंधित अधिकाऱ्यांना तसे आदेशही दिले.
बारामती इको सिस्टीम्स या कंपनीने शेतकरी वर्गातील दुध उत्पादकांसाठी सहजरीत्या बसविता येणारे अत्याधुनिक तंत्रज्ञान युक्त बायोगॅस प्रकल्प अनुदानावर उपलब्ध करून दिला आहे. (Uruli Kanchan News) महिलांना हा बायोगॅस कसा वापरायचा त्याची काळजी कशी घ्यायची त्यातून निघणार्या स्लरीचा सेंद्रिय शेतीसाठी खत म्हणून कसा वापर होतो या सर्वांची माहिती कंपनीकडुन देण्यात येत आहे.
सध्या घरगुती गॅस (LPG) सिलेंडरच्या वाढलेल्या दरांमुळे घरगुती गॅस वापरणे सर्वसामान्यांसाठी अशक्यप्राय झाले आहे. त्यातच, रॉकेलचाही अत्यल्प पुरवठा होत असल्याने इंधन उपलब्धीसाठी नेमके काय करावे असा प्रश्न सर्वांसमोर निर्माण झाला आहे. अशा स्थितीमध्ये पर्यावरणपूरक असलेला बायोगॅस सध्या शेतकर्यांसाठी उपयुक्त ठरत आहे. (Uruli Kanchan News) बायोगॅससाठी गुरांचे शेण महत्वपूर्ण घटक असून शेतकऱ्यांकडे असलेल्या गुरांमुळे आवश्यक असलेले शेण उपलब्ध होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हिताने बायोगॅस सयंत्र सर्व शेतकऱ्यांनी लावले पाहिजे असे मतहि गडकरी यांनी व्यक्त केले.
दरम्यान, बारामती इको सिस्टिम्सचा आधुनिक बायोगॅस अत्याधुनिक प्रकल्प शेतकऱ्यांना सक्षम बनविण्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे आणि हे पर्यावरणपुरक बायोगॅस सयंत्र कमीत कमी किमतीमध्ये भारतातील प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचावे. (Uruli Kanchan News) यासाठी अमुल डेअरीच्या माध्यमातून या प्रकल्पाला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासनही गडकरी यांनी यावेळी अभिमन्यु नागवडे यांना दिले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :