Sunday, May 17, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Uruli Kanchan : “भारतामध्ये इच्छामरणाचा कायदा असावा” उरुळी कांचन येथील शंकर पाटील यांनी सुसाईड नोट लिहून संपवली जीवनयात्रा, अवयवदानाचीही केली इच्छा व्यक्त

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Sunday, 15 March 2026, 17:37
Uruli Kanchan

photo- social media

Uruli Kanchan : उरुळी कांचन येथील कस्तुरी प्रतिष्ठानचे सचिव व सामाजिक कार्यकर्ते शंकर पांडुरंग पाटील (वय 48) यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. घटनास्थळी सापडलेल्या चिठ्ठीत “माझ्या मृत्यूसाठी कोणालाही जबाबदार धरू नये” असा स्पष्ट उल्लेख करत त्यांनी जीवनयात्रा संपवली. या घटनेमुळे उरुळी कांचन परिसरात हळहळ व्यक्त होत असून सामाजिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आश्रम रोड परिसरातील राहत्या घरात रविवारी सकाळी सुमारे नऊच्या सुमारास हा प्रकार समोर आला. शंकर पाटील यांनी आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत आपल्या मानसिक वेदना आणि जीवनातील धक्कादायक प्रसंगांचा उल्लेख केला आहे. “माझ्या मरणास कोणीही जबाबदार नाही. मी स्वतःच्या इच्छेने हा निर्णय घेत आहे,” असे त्यांनी स्पष्ट नमूद केले आहे.

 

चिठ्ठीत त्यांनी भारतात इच्छामरणाचा कायदा नसल्याची खंत व्यक्त करत, “मला जिवंतपणीच अवयवदान करायचे होते. माझ्या अवयवांमुळे चार-पाच लोकांचे आयुष्य वाचले असते. भारतात इच्छामरणाचा कायदा असावा,” अशी भावना व्यक्त केली आहे. तसेच, “माझे अवयव दान होत असतील तर ते करावेत,” अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली आहे.

चिठ्ठीत पुढे त्यांनी आपल्या आयुष्यात साथ दिलेल्या अनेक मित्रांचे आणि सहकाऱ्यांचे मनापासून आभार मानले आहेत. आई-वडील, नातेवाईक व मित्रांची माफी मागत “माझ्या या निर्णयामुळे तुम्हाला त्रास होणार असेल तर मला माफ करा,” असे भावनिक शब्द त्यांनी लिहिले आहेत.

चिठ्ठीत नमूद केल्याप्रमाणे, “संजूच्या निधनानंतर माझी जगण्याची इच्छा उरली नाही. त्या घटनेचा मला मोठा मानसिक धक्का बसला. त्यातून मी अजूनही बाहेर आलो नाही. त्यानंतर झालेल्या अपघातामुळे माझी मानसिक अवस्था अधिकच खालावली. मला झोप येत नाही, रोज देवाकडे मरण मागत आहे,” असेही त्यांनी नमूद केले आहे. वृद्ध आई-वडिलांची सेवा करता न आल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, शंकर पाटील हे अविवाहित असून सामाजिक कार्यात सक्रिय होते. कस्तुरी प्रतिष्ठानच्या माध्यमातून सामुदायिक विवाह सोहळे, आषाढी वारीदरम्यान वारकऱ्यांसाठी अन्नदान सेवा तसेच विविध सामाजिक उपक्रमांमध्ये ते सातत्याने पुढाकार घेत असत. त्यांच्या आकस्मिक निधनाने उरुळी कांचन परिसरात शोककळा पसरली आहे. या घटनेची नोंद उरुळी कांचन पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

Indapur News : इंदापुरात भीषण आग! शॉर्टसर्किटमुळे ‘सुपर गादी सेंटर’ जळून खाक; लाखोंचे नुकसान, दुकानदाराची मदतीसाठी आर्त हाक

Sunday, 17 May 2026, 15:32

Daund News : दौंड पोलिसांना धक्काबुक्की करून पळण्याऱ्या तडीपार आरोपीला अखेर बेड्या

Sunday, 17 May 2026, 15:27

Pune News : पुण्यात पैशांच्या वादातून वडिलांकडून मुलावर चेहऱ्यावर फेकले ॲसिड, तरुण गंभीर जखमी

Sunday, 17 May 2026, 15:07

Pune-Solapur Highway : सोरतापवाडीत ‘मांगूर’ माशांची बेकायदेशीर वाहतूक करणारी पिकअप जप्त ; उरुळी कांचन पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल..

Sunday, 17 May 2026, 13:12

Pune Big News : मुळशीत फॉर्च्युनर-रिक्षाची समोरासमोर धडक; रिक्षाचालक ठार, ठाकरे सेनेचे जिल्हाप्रमुख जखमी

Sunday, 17 May 2026, 13:06

Monsoon News : मॉन्सूनचे अंदमानात दमदार आगमन , केरळात मॉन्सून २६ मेपर्यंत धडकणार..

Sunday, 17 May 2026, 12:53
Next Post
Baramati and Rahuri By Election: Complete schedule for Baramati-Rahuri by-elections announced! Nomination filing from March 30; Baramati and Rahuri power to be decided on "this" day

Baramati and Rahuri By Election : बारामती-राहुरी पोटनिवडणुकीचं संपूर्ण वेळापत्रक जाहीर! 30 मार्चपासून उमेदवारी अर्ज; बारामती आणि राहुरीच्या सत्तेचा फैसला "या" दिवशी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.