उरुळी कांचन, (पुणे) : उरुळी कांचन ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच व उरुळी कांचन देवस्थान ट्रस्टचे खजिनदार युवराज कांचन यांनी गुरुवारी (ता. 09) अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला.
पुणे येथे झालेल्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते युवराज कांचन यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शिरूर – हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर कटके, आमदार चेतन तुपे, आमदार शंकर मांडेकर, जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, तालुकाध्यक्ष दिलीप वाल्हेकर, गुलाब चौधरी, युवराज काळभोर, दिलीप गाडेकर, प्रसाद कांचन, रोहिदास मुरकुटे, धनंजय टिळेकर, उत्कर्षा गोते, लोचन शिवले, आदी राष्ट्रवादीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पक्ष प्रवेशानंतर बोलताना युवराज कांचन म्हणाले, “शिरूर – हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर कटके यांचे सर्वप्रथम काम करून दाखवले. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कामाचा प्रभाव पाहून हा पक्षप्रवेश केला आहे. तसेच राज्याचे व पुण्याचे कणखर नेतृत्व असल्याने त्यांच्याबरोबर काम करण्याचा निर्णय घेतला आहे.