Uruli Kanchan Crime | उरुळी कांचन, (पुणे) : शेतमाल खरेदी करून तो दुबईला पाठविण्याच्या बहाण्याने उरुळी कांचन (ता. हवेली) येथील व्यक्तीने तब्बल २३ लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी एकावर यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धनंजय सुरेश शितोळे (रा. उरूळी कांचन ता. हवेली) असे फसवणूक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर अक्षय तानाजी काळभोर (रा. केडगाव, देशमुख मळा ता. दौंड) यांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय काळभोर हे केडगाव परिसरात राहण्यासाठी असून ते शेती व्यवसाय करतात.आरोपी शितोळे याने दुबईमध्ये माझी खुप मोठी ओळख असुन तेथे माझा मोठा गाळा आहे अश्या गप्पा मारून काळभोर यांचा विश्वास याने संपादन केला होता.
शेतकऱ्यांचा माल विकत घेवुन बाहेरील देशात पाठवितो म्हणून फसवणूक…!
आपण एकत्र शेतक-यांकडुन माल खरेदी करून तुमच्या कंपनीच्या नावाने बाहेर देशात माल निर्यात करू. तुम्ही मला २० लाख रूपये द्या अशी मागणी काळभोर यांच्याकडे केली होती. तसेच आपल्या शेतकऱ्यांचा माल विकत घेवुन बाहेरील देशात पाठवितो त्यामुळे तुम्ही दुस-या व्यापाऱ्याला माल दिला तर तो तुम्हाला फसवु शकतो असे वारंवार सांगून विश्वास संपादन केला होता.
दरम्यान, याचा फायदा घेत काळभोर यांनी आरोपी शितोळे यांना रोख ९ लाख रूपये तसेच खात्यावर ८ लाख ५० हजार रूपये व ५ लाख ५० हजार रुपयांचा २९ टन कांदा असे मिळून २३ लाख रूपयांची फसवणुक केल्याची तक्रार यवत पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार धनंजय शितोळे याच्यावर फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहा. फौजदार गाडेकर करीत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…
Health News : यवत येथे माहिती सेवाभावी संस्थेच्या वतीने रेशनिंग कार्ड व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न
Indapur News | युवा उद्योजक निर्माण होणे काळाची गरज 1; गट विकास अधिकारी विजयकुमार परिट