Uruli Kanchan : उरुळी कांचन, (पुणे) : देशी गायी व उरुळी कांचन येथील बारामती इको सिस्टिम्सचा आधुनिक बायोगॅस सयंत्राच्या स्लरीमुळे समृद्ध शेतकरी व शाश्वत शेती होऊ शकते. तसेच हा प्रकल्प भारतभर राबविण्यासाठी सर्व प्रकारे मदत करण्यात येईल असे आश्वासन केंद्रीय वाहतुक व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी दिले आहे. (Baramati Eco Systems’ modern biogas plant at Uruli Kanchan will be supported in all possible ways to implement it across India: Union Minister Nitin Gadkari assured..)
उरुळी कांचन – जेजुरी मार्गावरील शिंदवणे ग्रामपंचायत हद्दीतील बारामती इको सिस्टीम्स या बायोगॅस संयंत्र कंपनीचे अध्यक्ष अभिमन्यु नागवडे बाभुळसर बु (ता. शिरुर) यांची आधुनिक बायोगॅस संयंत्राबाबत भेट घेतली. (Uruli Kanchan ) यावेळी बारामती इको सिस्टीम्सच्या आधुनिक बायोगॅस बद्दल सर्व माहिती देण्यात आली. यावेळी नितीन गडकरी यांनी वरील आश्वासन नागवडे यांना दिले.
बारामती इको सिस्टीम्स या कंपनीने शेतकरी वर्गातील दुध उत्पादकांसाठी सहजरीत्या बसविता येणारे अत्याधुनिक तंत्रज्ञान युक्त बायोगॅस प्रकल्प अनुदानावर उपलब्ध करून दिला आहे. (Uruli Kanchan ) महिलांना हा बायोगॅस कसा वापरायचा त्याची काळजी कशी घ्यायची त्यातून निघणाऱ्या स्लरीचा सेंद्रिय शेतीसाठी खत म्हणून कसा वापर होतो या सर्वांची माहिती कंपनीकडुन गडकरी यांना देण्यात आली.
आधुनिक बायोगॅस संयत्राला २ ते ३ गायींचे २५ ते ३० किलो शेण व तेवढेच पाणी मिश्रण करुण टाकावे लागते. यामधुन शेतकऱ्याचा १० ते १२ लोकांचा दोन्ही वेळेसचा सर्व स्वयंपाक होतो. (Uruli Kanchan ) म्हणजे महिन्याला शेतकर्यांचे १ हजार ते दीड हजार रुपयांचे इंधन (एल, पी, जी) खर्चात बचत होते. तसेच प्रत्येक महिन्याला ४ ते ५ एकराला लागणारे १० ते १२ हजार रूपयांचे विद्राव्य खत या बायोगॅसच्या माध्यमातुन मिळते.
दरम्यान, शाश्वत शेतीस चालणा देणारे प्रकल्प भारतामध्ये राबविले पाहिजे व हा अत्यंत चांगला प्रकल्प भारतातील सर्व शेतकर्यांनी राबविल्यास नक्कीच भारतातील शेतकरी सक्षम होऊ शकतो. (Uruli Kanchan ) हा प्रकल्प भारतभर राबविण्यासाठी सर्व प्रकारे मदत करण्यात येईल असेही यावेळी गडकरी यांनी नागवडे यांना सांगितले. यावेळी बारामती इको सिस्टीम्सचे संचालक गौरव जगताप व गणेश भुजबळ उपस्थित होते.
अमुल डेअरीच्या माध्यमातून या प्रकल्पाला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन..
बारामती इको सिस्टिम्सचा आधुनिक बायोगॅस अत्याधुनिक प्रकल्प शेतकऱ्यांना सक्षम बनविण्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे आणि हे पर्यावरणपुरक बायोगॅस सयंत्र कमीत कमी किमतीमध्ये भारतातील प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचावे. (Uruli Kanchan ) यासाठी अमुल डेअरीच्या माध्यमातून या प्रकल्पाला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासनही गडकरी यांनी यावेळी अभिमन्यु नागवडे यांना दिले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Uruli Kanchan News : भवरापूर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी जानकू सातव बिनविरोध..
Uruli Kanchan News : कोरेगाव मूळ येथील अमर एज्युकेशन इनस्टीटयूटचे विद्यार्थी शंभर नंबरी..