Saturday, September 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Urali Kanchan : गुन्हेगार कृष्णा राठोडला ‘एमपीडीए’चा दणका! उरुळी कांचन पोलिसांची मोठी कामगिरी; अमरावती कारागृहात स्थानबद्ध

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Sunday, 14 December 2025, 18:19
Urali Kanchan

photo- ppn

Urali Kanchan : गावठी हातभट्टी दारु व्यवसायाच्या आधारे उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या हद्दीत दहशत माजविणाऱ्या सराईत एका गुन्हेगाराला अमरावती मध्यवर्ती कारागृहात स्थानबध्द करण्यात आले आहे. अशी माहिती उरुळी कांचन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन वांगडे यांनी दिली आहे. कृष्णा जॉनी राठोड (वय 20, रा. काळेशिवार, शिंदवणे, ता. हवेली, जि. पुणे) असे स्थानबद्ध करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. (Urali Kanchan)

उरुळी कांचन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन वांगडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, कृष्णा राठोड हा प्रतिबंधक कारवाईस न जुमानता सातत्याने हातभट्टी गावठी दारू तयार करुन विक्रीचा व्यवसाय आणि त्यायोगे सार्वजनिक सुव्यवस्थेत बाधक असलेली कृत्ये करत होता. त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 अंतर्गत यापूर्वी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात पाच गुन्हे दाखल असून, अवैध दारूभट्टी चालवणे, विक्री करणे तसेच तक्रारदारांना धमकावणे असे गंभीर आरोप आहेत.

सदर इसमाच्या बेकायदेशीर कृत्यांमुळे परिसरातील सार्वजनिक सुव्यवस्थेला बाधा निर्माण होत असल्याने पोलीस निरीक्षक सचिन वांगडे यांनी स्थानबद्धतेचा प्रस्ताव पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल यांच्याकडे सादर केला होता. प्रस्तावास मान्यता देत जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी जितेंद्र डूडी यांनी एमपीडीए कायद्यानुसार स्थानबद्धतेचे आदेश जारी केले. त्यानुसार शनिवारी (ता. 13) कृष्णा राठोड याला ताब्यात घेऊन अमरावती येथील मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे.

दरम्यान, आगामी नगरपालिकेच्या तसेच जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका शांततेत व भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांनी अवैध धंद्यांविरोधात कडक भूमिका घेतली आहे. याच पार्श्वभूमीवर सराईत हातभट्टीवाल्यावर महाराष्ट्र प्रतिबंधक कायदा (एमपीडीए) अंतर्गत स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली असल्याचे वांगडे यांनी सांगितले.

 

सदरची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सचिन वांगडे, पोलीस उपनिरीक्षक प्रविण कांबळे, सहा. फौजदार महेश बनकर, पोलीस हवालदार योगेश नागरगोजे, अजित काळे, सचिन जगताप, शैलेश लोखंडे, प्रवीण चौधर, निलेश जाधव, प्रशांत पवार, उध्दव गायकवाड, कमलेश होले पोलीस शिपाई सागर बोत्रे, राजकुमार भिसे, बंडु बालगुडे यांनी केली आहे.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

मनोज जरांगेंच्या आंदोलनाला मोठं यश! विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीबाबत सरकारकडून महत्त्वाचा निर्णय जाहीर

Friday, 4 September 2026, 22:53

अभिजीत दिपकेंचं नवं टार्गेट ठरलं! धर्मेंद्र प्रधानांनंतर आता CJPची ‘या’ मुद्द्यावर मोठी मोहीम,नवी रणनीती काय?

Friday, 4 September 2026, 22:21

मावशी, साप आला!’ म्हणत 65 वर्षीय आजीचे दागिने लंपास; यवत पोलिसांनी सराईत चोरट्याला ठोकल्या बेड्या, आजीने मानले पोलिसांचे आभार..

Friday, 4 September 2026, 21:53

ध्वनी मर्यादेचे उल्लंघन केल्यास मंडळावर कारवाई होणार ; पोलिस निरीक्षक संतोष तासगावकर

Friday, 4 September 2026, 21:27

नागपुरात DJ बंदीला केराची टोपली! लेझरच्या रोषणाईत दणदणाटात दहीहंडी उत्सव; नियम धाब्यावर

Friday, 4 September 2026, 21:09

लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपणार! ऑगस्टचा ₹1,500 हप्ता ‘या’ तारखेनंतर खात्यात; मोठी अपडेट समोर

Friday, 4 September 2026, 19:46
Next Post

Pune Crime: पुणे जिल्हा हादरला! 5 वर्षांच्या चिमुकलीवर अमानुष अत्याचार करून हत्या, तासाभरात आरोपीला अटक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp