(Pune News ) पुणे : लांबलेल्या परीक्षा, विस्कळीत विस्कळीत झालेले शैक्षणिक वेळापत्रक आणि त्याचे पुढील शैक्षणिक वर्षावर होणारे परिणाम यावर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभेत गदारोळ झाला. यावेळी संतापलेल्या अधिसभा सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरत स्वतंत्रपणे चौकशी, दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली असून त्यावर कुलगुरू डॉ. कारभारी काळे यांनी समिती नियुक्त करण्याची घोषणा केली आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची अर्थसंकल्पीय अधिसभा कुलगुरू डॉ. कारभारी काळे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी झाली. यावेळी प्र कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार आदी या वेळी उपस्थित होते.
परीक्षेतील सुधारणा तत्काळ करण्यासाठी समिती स्थापना करण्याची मागणी..!
या अधिसभेत कुलगुरूंनी अध्यक्षीय अहवाल सादर केल्यानंतर गदोरोळाला सुरुवात झाली. लांबलेल्या परीक्षा, विस्कळीत विस्कळीत झालेले शैक्षणिक वेळापत्रक आणि त्याचे पुढील शैक्षणिक वर्षावर होणारे परिणाम आणि परिक्षा विभागाच्या कारभारावर ताशेरे ओढले. तसेच परीक्षेतील सुधारणा तत्काळ करण्यासाठी समिती स्थापना करण्याची मागणी अधिसभा सदस्य विनायक आंबेकर यांनी केली.
त्यावेळी सभागृहाच्या भावना लक्षात घेत कुलगुरूंनी डॉ. राजेंद्र विखे पाटील, प्रसेजनित फडणवीस, डॉ. अपूर्व हिरे, राहुल पाखरे, प्रा. बाळासाहेब सागडे, विनायक आंबेकर, ज्योत्स्ना एकबोटे, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांची समिती नियुक्त करण्यात आली. दोन महिन्यांत ही समिती अहवाल सादर करेल, असे प्र कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे यांनी सांगितले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : महापालिकेचे नवे आरोग्य प्रमुख पदी डॉ. भगवान पवार!