पुणे: महाराष्ट्र भाजपा आयोजित ‘महाविजय 2024’ च्या संकल्पपूर्ती करीता लोकसभा व विधानसभा निवडणूक प्रमुख आणि समन्वयक यांच्या 2 दिवसीय प्रशिक्षण शिबिराला उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी, उत्तन येथे संबोधित केले. यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री चंद्रकांत दादा पाटील, मंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार, ॲड. माधवीताई नाईक, प्रदेश पदाधिकारी, आमदार, खासदार उपस्थित होते.
राज्यातील सर्व मतदार संघात आणि सर्व बुथवर भारतीय जनता पार्टीची ताकद वाढवायची आहे. भाजपा संपूर्ण ताकदीने निवडणूक लढणार, मात्र जिथे मित्र पक्ष लढतील तिथे त्यांच्या पाठीशी देखील आम्ही उभे राहणार. ही निवडणूक भाजपासाठी नाही तर भारतासाठी महत्वाची आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताला पुढे नेले, त्यामुळे त्यांना पुन्हा देशाचे पंतप्रधान करणे हेच ध्येय आहे, असं देखील फडणवीस म्हणाले.
पंतप्रधान मोदी यांचा 2024 ते 2029 हा कार्यकाळ भारतासाठी निर्णायक असणार आहे. यासाठी आपण सर्व कार्यकर्त्यांना ध्येय नजरेसमोर ठेऊन काम करावे लागेल. या प्रशिक्षणवर्गानंतर सर्वजण उत्साहात आणि आनंदात कामाला लागतील, असा मला विश्वास आहे. भाजपाचे सर्व कार्यकर्ते पक्षवाढीसाठी प्रचंड मेहनत घेत असून त्यांचा मला अत्यंत अभिमान आहे. पक्षाचे विचार घराघरांत पोहेचविणा-या या सेनापतींच्या भरवश्यावर आगामी निवडणुकांमध्ये भाजपा नक्कीच मोठा विजय प्राप्त करणार आहे, असंही फडणवीस म्हणाले.