भोर : अवकाळी पावसाने भोर तालुक्याला दोन-तीन दिवसांपासून चांगलेच झोडपून काढले. त्यामुळे कापणीस आलेली कडधान्य पिके सध्या पाण्याखाली गेली असून, कडधान्य पिके भुईसपाट झाली असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
भोर तालुक्यात ओढे-नाले खळखळून वाहू लागले आहेत. एकीकडे भात पिकाला पाऊस नाही म्हणून शेतकरी पंधरा दिवसांपासून पावसाच्या प्रतीक्षेत होते. पावसामुळे शेतकऱ्यांची शेतातील कामे ठप्प झाली आहेत. तर, ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन तसेच भुईमूग काढून घरी नेला आहे, त्यांना सतत पाऊस पडत असल्याने शेंगा वाळवता येत नाहीत. दरम्यान, सोयाबीन व भुईमुगाच्या शेंगांना बुरशी चढू लागल्याने पिके पूर्णतः खराब होऊ लागली आहेत.