बापू मुळीक / सासवड : गराडे (ता. पुरंदर) येथील ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी सुजाता निलेश कुंभार यांची बिनविरोध निवड झाली आहे. गराडेचे उपसरपंच हरिश्चंद्र वाडकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर, रिक्त झालेल्या पदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. यावेळी निर्धारित कालावधीत सुजाता कुंभार यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग्राम विकास अधिकारी विलास बडधे यांनी त्यांची बिनविरोध निवड जाहीर केली.
यावेळी भाजपचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष गंगाराम जगदाळे, सरपंच नवनाथ गायकवाड, शिवाजी जगदाळे, दत्तात्रेय जगदाळे, योगेश जगदाळे, दीपक जगदाळे, मोहन जगदाळे, सदस्य ललिता जगदाळे, सुप्रिया रावडे, अनिता जगदाळे, नितीन जगदाळे, चंद्रकांत जगदाळे, सतिश जगदाळे, निलेश कुंभार, नितीन जगदाळे आदी उपस्थित होते.
नूतन उपसरपंच कुंभार बोलताना म्हणाल्या की, महिलांचे प्रश्न, पाणी, आरोग्य, रस्ता विविध विकास कामासाठी माझ्या पदाच्या कार्यकालात सर्वांना सहमतीत घेऊनच पुढे विकास कामे करणार आहे. तसेच शासनाच्या लाडक्या बहिणी अशा विविध योजना माझ्या गावात घराघरापर्यंत पोचवणार असल्याची माहिती उपसरपंच सुजाता कुंभार यांनी दिली.