बापू मुळीक
सासवड : हिवरे (ता. पुरंदर) येथील ग्रामपंचायत सरपंच पदी पूनम सोपान कामठे यांची बिनविरोध निवड झाली. हिवरेच्या सरपंच भारतीय गायकवाड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदासाठी निवडणूक घेण्यात आली. त्यामध्ये पूनम कामठे यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी सुहास कांबळे, तलाठी कल्पेश कटारे व ग्रामसेविका महादेवी हरपळे यांनी कामठे यांची बिनविरोध निवड जाहीर केली.
हिवरे येथील ग्रामस्थांच्या मदतीने मला जे सरपंच पद मिळाले आहे, त्यानुसार गावातील रस्ते, पाणी, आरोग्य, महिलांच्या सुविधासाठी गावच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामुख्याने माझ्या पदाच्या कार्यकाळात उत्तम प्रकारे गती देणार असून, शासकीय योजना या तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे नूतन सरपंच पूनम कामठे यांनी सांगितले.
यावेळी एम. के. गायकवाड, गुलाब गायकवाड, धर्मराज गायकवाड, माजी सरपंच भारती गायकवाड, उपसरपंच रामदास कुदळे, ग्रामपंचायत सदस्य सोनाली चव्हाण व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते. सरपंच पदाविषयी माहिती देताना गावच्या ज्येष्ठांच्या सल्ल्यांनुसार गावचा माझा कार्यकाळामध्ये नम्रतापूर्वक विकास करणार असल्याचे कामठे यांनी सांगितले.