सासवड : पुरंदर तालुक्यातील बोपगाव ग्रामपंचायतच्या सरपंचपदी ज्योती कुंडलिक फडतरे यांची बिनविरोध निवड झाली आहे. प्रियंका शामराव फडतरे यांनी सरपंचपदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर निवडणूक झाली. गावामध्ये ठरल्याप्रमाणे एकमेव अर्ज आल्याने त्यामध्ये ज्योती फडतरे यांची निवड झाली. तसेच सुवर्णा मधुकर जगदाळे यांचीही उपसरपंच पदी निवड झाली आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मंडलाधिकारी सुहास कांबळे यांनी काम पाहिले. ग्रामसेविका राखी ढगारे, तलाठी कल्पेश कटारे निवडणूक कामी सहकार्य केले. यावेळी उपसरपंच सुवर्णा मधुकर जगदाळे, ग्रामपंचायत सदस्या प्रियांका फडतरे, संजीवनी फडतरे, हर्षदा पवार, शालन फडतरे, सुषमा फडतरे, सारिका गुरव, स्वाती फडतरे यांनी निवडणूक प्रक्रियेत सहभाग घेतला. यावेळी अभिजीत जगताप, योगेशनाना फडतरे, दयानंद फडतरे आदींसह बोपगावकर ग्रामस्थ उपस्थित होते.
सरपंच ज्योती फडतरे म्हणाल्या की, गावाने माझ्यावर विश्वास ठेवून मला सरपंच पदाची संधी दिली आहे, त्या संधीचे सोनं करून गावाच्या विकासासाठी सातत्याने कार्यरत राहील. प्रामुख्याने महिलांचे प्रश्न, पाणी प्रश्न, रस्ते इत्यादी कामावर भर देईल.