युनूस तांबोळी
शिरूर : ग्रामीण भागातील अंजूमन इत्तेहाद तंबोलीयान जमात राहुरी तालुका अध्यक्षपदी अफजल अब्बास तांबोळी यांची बिनविरोध निवड करण्यात आली असून उपाध्यक्षपदी फारूक तांबोळी व हुसेन तांबोळी यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीने परिसरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
अंजूमन इत्तेहाद तंबोलीयान जमातची बैठक नुकतीच सात्रळ ( ता. राहूरी ) येथील आनंद गूरूकूल स्कूल मध्ये संपन्न झाली. यावेळी अशपाक तांबोळी, अन्सार बनेमिया तांबोळी, धोंडू तांबोळी, कबीर तांबोळी, रियाज तांबोळी, अन्सार जमादार तांबोळी आदी उपस्थित होते.
यावेळी झालेल्या बैठकीत अंजूमन इत्तेहाद तंबोलीयान जमात राहुरी तालुका अध्यक्षपदी अफजल अब्बास तांबोळी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तर उपाध्यक्षपदी फारूक तांबोळी व हुसेन तांबोळी यांची तर खजीनदारपदी वसीम तांबोळी, सचिवपदी शकूर तांबोळी, सहसचिव मतीन तांबोळी यांची निवड करण्यात आली.
या बैठकीस सोनगाव, सात्रळ, धानोरे, कोल्हार खुर्द, राहुरी फॅक्टरी, देवळाली, प्रवरा, मांजरी, वांबोरी, मानोरी, केंदळ या अहमदनगर जिल्ह्यातील अंजूमन इत्तेहाद तंबोलीयान जमातच्या सदस्यांनी सहभाग घेतला.
ग्रामीण भागातील मुस्लिम संघटनेच्या मुलांच्या शिक्षणासाठी कार्यरत आहे. समाजातील गरीब मुलामुलींच्या विवाहासाठी संस्था कार्यरत आहे. तसेच बेरोजगारी, व तरुणांना उद्योग व्यवसायात शासकीय मदत मिळवून देण्यासाठी भविष्यात कार्यरत होणार असल्यासचे अध्यक्ष अफजल तांबोळी यांनी सांगितले.
सध्या डीजीटल यूग असल्याने समाजातील कुटूंबाना एकत्रित आणण्यासाठी सर्वतोपरी काम केले जाईल तसेच घरारात पोहचून त्यांची माहिती संकलीत करून तंबोलीयान जमात संगणकीय खानेसुमारी तयार करण्याचे काम केले जाईल, त्यातून संघटना मजबूत होण्याचे काम होईल, असे सचिव शकूर तांबोळी यांनी सांगितले.