पुणे : सद्या पोलीस भरती सुरु आहे. तरुण तरुणी पोलीस होण्याच स्वप्न घेऊन मेहनत घेत असतात. अंगात पोलिसांची वर्दी घालून देशसेवा करण्याचं स्वप्नं त्याचं एकट्याच नसत तर ते पूर्ण कुटूंबाच स्वप्न असत. अशाच एकला तरुणान आपल्या स्वप्नाला गवसणी घालण्यासाठी अहोरात्र मेहनत ही घेतली होती. बघता बघाता परीक्षेचे तारीख जाहीर झाली आणि आपले नशीब आजमावण्यासाठी त्याने पुणे गाठलं खर पण नियतीला काही वेगळच मंजूर होतं. पोलीस भरतीच्या चाचणीवेळी त्याने पोलीस मैदानातच आपला श्वास घेतला.
ही दुर्देवी घटना घडली आहे संगमनेर तालुक्यातील कोठे गावचा रहिवासी असलेल्या तुषार भालके या 27 वर्षीय युवकासोबत. पुणे येथे सुरू असलेल्या पोलीस भरती दरम्यान तुषार भालके या उमेदवार धाव चाचणीत धावत असताना त्याला अचानक चक्कर आली आणि तो जमिनीवर पडला. दरम्यान त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल केले असता त्याचा उपचार दरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत असून हा घटनेमुळे भालके कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
राज्यातली ही तिसरी घटना..
पुण्यात शिवाजीनगर पोलीस ग्राऊंडवर पोलीस भारती प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान, आज सकाळी 8 वाजताच्या सुमारास तुषार भालके या युवकाने रनिंगचे तीन राऊंड पूर्ण केले. पण धावत असताना त्याच्या पायात अचानक क्रँम्प आला, मस्सल ब्रेक झाले आणि तो जागीच कोसळला. त्यानंतर घटनास्थळी उपस्थित पोलीस भर्ती अधिकाऱ्यांनी तात्काळ त्याला अँम्ब्युलन्समधून पुण्यातील ससून रुग्णालयात नेलं.
पण डिहायड्रेशन होऊन प्रथम त्याच्या किडनी फेल झाल्या आणि मग ह्रदय बंद पडलं. आणि त्यातच मल्टिपल ऑर्गन फेलुअर होऊन त्याचा उपचारादरम्यान दूर्दैवी अंत झाला. पोलीस भर्ती दरम्यान युवकाचा दुर्दैवी अंत होण्याची राज्यातली ही तिसरी घटना आहे. यापूर्वी एसआरपीएफच्या भर्तीत मुंबईत दोन युवक दगावलेत. त्यानंतर आज पुण्यात हा प्रकार घडलाय.