-बापू मुळीक
पुरंदर : पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप यांच्या अध्यक्षतेखाली आचार्य अत्रे सांस्कृतिक भवन, सासवड येथे आम सभा पार पडली.
यावेळी पुरंदर पंचायत समिती, पुरंदर प्रांत, पुरंदर तहसीलदार, सासवड नगरपालिका, जलसंधारण विभाग, महाराष्ट्र इलेक्ट्रिक बोर्ड पुरंदर, एसटी आगार सासवड, सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच इतर प्रशासनातील सर्वच अधिकारी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून ही आम सभापार पडली. यावेळी अनेक ठराव सर्वानुमते ठरवून पास करण्यात आले. यावेळी पुरंदरच्या जनतेने, विविध गावातून आलेले सरपंच, उपसरपंच, आम जनता यांच्या प्रश्नाने प्रशासनातील प्रत्येक विभाग ढवळून काढला. यामध्ये सर्वात जास्त रोष महाराष्ट्र इलेक्ट्रिक महामंडळावर होता.
यामध्ये डीपी, कनेक्शन, तारा, वाढीव विज बिल यावर सर्वच लोकांनी हल्लाबोल केला. रस्ते बांधकाम विभागातील अनधिकृत होर्डिंग यावर काय कारवाई केली, सासवड मधील रस्ते आरोग्य यावर कुठल्या प्रकारे काम सुरु आहे, जेजुरी ग्रामीण मधील भागांना ग्रामपंचायत दर्जा कधी मिळणार, पुरंदर उपसा योजनेच्या त्रुटी व समस्या, पानंद रस्ते, गावठाण रस्ते या पुरंदर पंचायत समिती, पुरंदर प्रांत, पुरंदर तहसीलदार, सासवड नगरपालिका, जलसंधारण विभाग या सर्वच प्रश्नांनी प्रशासनातील प्रत्येक विभागांची पळापळ झाली.
अधिकाऱ्यांनी जनतेने विचारलेल्या प्रश्नांची उत्तर महाराष्ट्र इलेक्ट्रिक बोर्ड पुरंदर, एसटी आगार सासवड, सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच इतर प्रशासनातील सर्वच अधिकारी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून ही आम सभा देण्यास टाळाटाळ केल्यानंतर, आमदार संजय जगताप यांना जनतेने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यावी. यावेळी अनेक ठराव सर्वानुमते ठरवून पास करण्यात आले.
एकंदरीत आमदार संजय जगताप यांच्या माध्यमातून यावेळी जनतेने विविध गावातून आलेले सरपंच यांच्यासमवेत ही आमसभा विशेष वादळी ठरली. यावेळी आमदार संजय जगताप, प्रांत वर्षा लांडगे, तहसीलदार विक्रम राजपूत, गटविकास अधिकारी अमिता पवार, तसेच प्रशासनातील सर्वच अधिकारी, सर्वच पक्षातील नेते यावेळी उपस्थित होते