अमोल दरेकर/सणसवाडी ( शिरूर) : १९ वर्षाखालील पुणे जिल्हास्तरीय प्रोफेशनल डेडलिफ्ट प्रो चॅम्पियन लीगचे आयोजन करण्यात आले होते. पुणे याठिकाणी करण्यात आले होते. या खेळात अनेक खेळाडू सहभागी झाले होते.
६० किलो वजनी गटात विशाल याने १६०किलो डेडलिफ्ट केले. असा अप्रतिम प्रदर्शन करून त्याने प्रथम क्रमांक मिळाला. त्यामुळे त्यांची राष्ट्रीय पातळीवर एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. विशाल यादव ग्रामीण भागात राहात असून त्याला खेळाची आवड जपली आहे. त्याला गौतम राज आणि अनिल कच्छप यांनी त्याला मार्गदर्शन केले.
मामा दीपक पाटील आणि भाऊ फोटोग्राफर अँड फिल्ममेकर शुभम यादव यांनी मला पाठींबा दिल्याने हे यश सांपादन करू शकल्याची प्रतिक्रिया यावेळी त्यांनी दिली. त्याने भविष्य भारतासाठी खेळावं हे कुटुंबीयाचं स्वप्न आहे.