पुणे : शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून महिला अत्याचारासंदर्भात एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीमध्ये पॉर्न फिल्ममधील कलाकार घेतल्याचा भारतीय महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी ठाकरे गटावर जोरदार टीका केली आहे. त्यानंतर आता शिवसेना ठाकरे गट आणि भाजपच्या महिला नेत्यांमध्ये चांगलीच खडाजंगी सुरु झाली आहे. चित्रा वाघ यांच्या टीकेला उपनेत्या सुषमा अंधारे यांनी त्यांच्या स्टाईलने उत्तर दिले आहे. भाजपच्या आक्रस्थळे बाईने काहीतरी बोलण्याचा प्रयत्न केला आहे. सुरुवातीला तीर मारायचा आणि नंतर वर्तुळ करायचे, अशी त्यांची जुनीच सवय आहे. यापूर्वी आमदार नितेश राणे यांनी देखील असाच प्रयत्न केला होता, असा जोरदार पलटवार सुषमा अंधारे यांनी केला.
सर्वप्रथम पॉर्न इंडस्ट्री आपल्याकडे नाही, चित्राबाई या पॉर्न फिल्म बघत असतील, आधी आपल्या पक्षाचा सल्ला घ्या. केवळ अर्धवट माहितीच्या आधारे बोलायचा प्रयत्न वाघ यांनी केला आहे, असे म्हणत सुषमा अंधारे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. याबरोबरच कोणत्याही राजकीय जाहिराती बनवत असताना प्रोडक्शन हाऊसकडून कलाकारांचे रेकॉर्ड तपासले जाते. तसेच सर्व प्रोग्राम सेन्सॉर केला जातो, भारत सरकारकडून देखील सेन्सॉर होत असतात. याबाबत माझे ज्ञान कमी आहे, चित्रा वाघ यांचे पॉर्न व्हिडिबाबत ज्ञान अफाट असावं किंवा त्या पारंगत असाव्यात, अशा शब्दांत सुषमा अंधारे यांनी चित्रा वाघ यांच्या प्रश्नाला उत्तर दिले आहे.
दरम्यान, कर्नाटकात जो पॉर्न उमेदवार तुम्ही उभा केला, ज्याने हजारो महिलांचं लैंगिक शोषण केले आहे. घरात काम करणाऱ्या महिलांनाही त्यांनी सोडले नाही. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींना तुम्ही प्रश्न का विचारत नाहीत. मोदी हे प्रज्वल रेवण्णाच्या बाबतीत का काहीच बोलत नाही. 2500 पेक्षा जास्त व्हिडिओ क्लीप लोकांसमोर आल्या आहेत. त्याला देशातून पळवून लावण्याचं काम तुम्ही केले आहे, तो मात्र फ्रान्समध्ये मजा मारत फिरतोय आणि येथे तुम्ही आम्हाला प्रश्न विचारत आहात. थोडी तरी लाज वाटू द्या, पाण्यात बुडून मरा… अशा तीव्र संतापजनक शब्दांत खासदार प्रियंका चुतर्वेदी यांनी चित्रा वाघ यांच्यावर पलटवार केला आहे.