पुणे : पुणे शहरात वाहन चोरट्यांचा सुळसुळाट झाला आहे. गेल्या दोन दिवसामध्ये विविध भागातून तब्बल १३ दुचाकींची चोरी झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. वाहनचोरीची नोंद पुणे पोलिसांकडे आहे. ही नोंद फक्त चोरी झालेल्या गाड्यांची आकडेवारी म्हणता येईल. नोंद न झालेल्या गाड्यांची आकडेवारी वेगळीच म्हणता येईल. मात्र, शहरात वाहन चोरट्यांनी चांगलाच धुमाकूळ घातला आहे. या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, शहरातील हडपसर, बंडगार्डन, विश्रामबाग, भारती विद्यापीठ, अलंकार तसेच येरवडा पोलीस ठाण्यात रविवारी सात गुन्ह्यांची नोंद झाली आहे. तर, शनिवारी सहा दुचाकी चोरीचे गुन्हे येरवडा, चंदननगर, वानवडी, हडपसर, भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत झाले आहेत. शहरातील गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी पोलिसांकडून लक्ष केंद्रीत केले जातय.
एकीकडे गुन्हेगारांवर कारवाई सुरू आहे. तर दुसरीकडे मात्र सराईत वाहन चोरांनी शहरात उच्छाद मांडल्याचे दिसत आहे. घराजवळ, सोसायटी किंवा कार्यालयाच्या बाहेर पार्क केलेल्या गाड्या चोरीला जाण्याच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे वाहन चोर्या रोखण्याचे मोठं आव्हान पुणे पोलिसांसमोर आहे.
या भागातून दुचाकी चोरी
विश्रामबाग – २, बंडगार्डन-१, भारती- २, अलंकार-१., येरवडा- २, हडपसर- २, कोरेगांव पार्क १, चंदननगर- १, वानवडी– १