सासवड: सासवड येथील श्रीशाज आईस्क्रीम पार्लरचे मालक राहुल नामदेव टिळेकर (वय ४१, रा. सासवड) यांच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. अजय जगताप, दया उर्फ दयानंद जगताप (दोघेही रा. सासवड ता. पुरंदर जि. पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांना न्यायालयात हजर असता त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणी विजय नामदेव टिळेकर (रा. सासवड) यांनी फिर्याद दाखल केली आहे.
18 जुलै रोजी सासवड येथील श्रीशाज आईस्क्रीम पार्लरचे मालक राहुल टिळेकर यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. त्यानंतर त्यांना चिंतामणी हॉस्पिटल सासवड येथे नेले. तेथील डॉक्टरांनी त्यांच्यावर प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी नोबेल हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले. या प्रकरणी राहुल टिळेकर यांचे बंधू नामदेव टिळेकर यांनी आरोपी अजय जगताप, प्रताप जगताप, दया उर्फ दयानंद जगताप (सर्व रा. सासवड ता. पुरंदर जि. पुणे) या तिघांसह अनोळखी तीन इसमांविरोधात फिर्याद दाखल केली. आता या प्रकरणी दोन जणांना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. पुढील तपास सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी हे करीत आहेत.