पुणे : गुन्हेगारीचे आकर्षण, तसेच दहशत माजविण्यासाठी बेकायदा देशी बनावटीचे पिस्तूल बाळगणाऱ्या सराईतासह त्याच्या साथीदाराला पोलिसांनी सोमवारी (दि. १८) अटक केली. त्यांच्याकडून दोन पिस्तुले आणि चार काडतुसे जप्त केली.
रितेश बाबासाहेब कसबे (वय १८, रा. महंमदवाडी रस्ता, हडपसर) व राहुल संजय चौधरी (वय २१, रा. हडपसर) ही आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी काळेपडळ पोलीस ठाण्यात बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारांच्या हालचालीवर पोलिसांनी नजर ठेवली आहे. काळेपडळ पोलीस ठाण्यातील तपास पथकातील सहायक पोलीस निरीक्षक अमित शेटे आणि पथक गस्त घालत होते.