पुणे : बांधकाम कंपनीकडून आगाऊ रक्कम घेऊन बांधकाम साहित्य न पुरवून तीन कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार सोमवारी (दि. ६) उघडकीस आला. या प्रकरणी मुंढवा पोलिसांनी दोघाविरुद्ध गुन्हा दाखल केला. छगनलाल गुलाबचंद गुंदेशा (वय ६०) व नीरज छगनलाल गुंदेशा (वय ३१, रा. दोघे रा. भवानी पेठ) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी श्रीधर मोहन दुमाळे (वय ५०, रा. सिंहगड रस्ता) यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. दुमाळे खासगी कंपनीचे प्रतिनिधी आहेत. या बांधकाम कंपनीकडून घोरपडी परिसरात गृहप्रकल्पाचे काम सुरू आहे. २०२२ मध्ये गुंदेशा यांनी बांधकाम कंपनीतील प्रतिनिधी दुमाळे, सहकारी मुकेश बंबोली, आशिष मांढरे यांची भेट घेऊन पोलादाचा पुरवठा करण्याचा करार केला. त्यासाठी या कंपनीने त्यांना दोन कोटी ९७ हजार रुपये दिले, पण त्यांनी मालाचा पुरवठा केला नाही.