Tuesday, November 17, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

कसबा पेठेत मंडळाच्या स्पीकरच्या आवाजावरुन दोन गट एकमेकांविरोधात भिडले ! लाकडी बांबु, तलवारीने केली मारहाण

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Monday, 14 October 2024, 14:53

पुणे : पुण्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मंडळाच्या स्पीकरच्या आवाजावरुन झालेल्या वादात दोन गट परस्पराविरोधात भिडले आहेत. एकमेकांना लाकडी बांबु, तसेच तलवारीने मारहाण केल्याची घटना घडली आहे. ही घटना नटराज मित्र मंडळाच्या शेजारी शनिवारी १२ ऑक्टोबर रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी दोन्ही गटांकडून फिर्यादी देण्यात आल्या आहेत.

पहिली फिर्याद आशिष विजय तारु (वय-३२, रा. कसबा पेठ) यांनी फरासखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी प्रमोद बाळासाहेब आगणे (वय-४३, रा. नटराज मित्र मंडळाशेजारी, कसबा पेठ) याला अटक करण्यात आली आहे.

तारू यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांचा मित्र तेजस राऊत हा मंडळातील देवीजवळ प्रसाद वाटत होता. त्यावेळी प्रमोद आगणे याने तू बाहेरून येऊन जास्त शहाणपणा करतोस, असे म्हणून माझ्याकडे काय बघतोस, असे म्हणत तेजसच्या कानाखाली मारली. त्यानंतर मंडळाच्या इतर लोकांनी त्यास तू शिव्या का देतो, असे म्हणाले.

दरम्यान, त्यावेळी प्रमोद हा त्याच्या घरात गेला. आणि घरातून तलवार घेऊन बाहेर आला. मंडळाच्या ठिकाणी असलेल्या महिलांच्या गर्दीत घुसण्याचा त्याने प्रयत्न केला. तेव्हा फिर्यादी यांनी त्याच्या हातातून तलवार काढून घेत असताना फिर्यादी यांच्या हाताच्या बोटाला तलवार मारुन त्यांना गंभीर जखमी केले.

तर दुसरी फिर्याद वनिता प्रमोद आगणे (वय-३५, रा. कसबा पेठ) यांनी फरासखाना पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी आशिष तारु, निलेश देसाई (वय-३८), अक्षय तारु (सर्व रा. कसबा पेठ) यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात एकूण १० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वनिता आगणे यांनी दिलेल्या आगणे फिर्यादीनुसार, वनिता यांच्या घराजवळ नटराज मित्र मंडळाचा नवरात्र महोत्सव सुरु होता. मंडळाने मोठया आवाजात साऊंड सिस्टिम लावली होती. फिर्यादी यांचे पती प्रमोद आगणे यांनी मंडळांच्या व्यक्तींना आवाज कमी करा असे सांगितले. त्याचाच राग मनात धरुन ललित भोकरे याने प्रमोद आगणे यांना शिवीगाळ केली. निलेश देसाई याने फिर्यादी यांच्या कानाखाली मारली. आशिष तारु, निलेश आणि बाबु तारु यांनी प्रमोद यांच्या डोक्यात लाकडी बांबुने मारहाण केली. इतर लोकांनी देखील हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक शेख करीत आहेत.

 

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

अजित पवारांच्या विमान अपघाताचा तपास चर्चेत! महत्त्वाचे CCTV फुटेज देण्यास मुंबई पोलिसांची नकारघंटा..

Tuesday, 17 November 2026, 17:05

रोहित पवारांचं ‘मफलरवाला नेता’ विधान; सुप्रिया सुळेंनी डायरेक्ट हात जोडले, म्हणाल्या “रोहितचं मन अस्वस्थ आहे…

Tuesday, 17 November 2026, 16:55

जंक फूडला टांग; आरोग्यासाठी सायकलची ‘पांग’!पुणे ते शिर्डी 180 किलोमीटरचा प्रवास; सायकलस्वारांनी दिला सकस आहाराचा संदेश

Tuesday, 17 November 2026, 16:19

वाळू माफियांना शिरूर अन् श्रीगोंदा महसूल विभागाचा जोरदार दणका! आठ सेक्शन अन् नऊ फायबर बोटी जिलेटिनने फोडल्या; घोड धरणातील अवैध वाळू उपशावर मोठी कारवाई!

Tuesday, 17 November 2026, 16:07

राज्य मंत्रिमंडळ बैठकीतील ४ धडाकेबाज निर्णय! नक्षलवाद्यांनी लुटलेल्या शस्त्रांची माहिती द्या अन् मिळवा रोख बक्षीस

Tuesday, 17 November 2026, 15:50

पुण्यात साखरपुड्यासाठी आले, हॉटेलबाहेर गाडी पार्क केली अन् नंतर घडला विचित्र प्रकार; चोरट्यांनी संधी साधत…

Tuesday, 17 November 2026, 14:57
Next Post

बाणेर टेकडीवर फिरायला गेलेल्या मित्र-मैत्रिणीला बेदम मारहाण; तरुणीच्या करंगळीवर केले वार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp