शिक्रापूर (पुणे): केंदूर (ता. शिरूर) येथे दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्या लोकांना ‘तुम्ही येथे धिंगाणा घालू नका मी पोलिसांना बोलावेल,’ असे म्हटल्याने दोघांनी दोन अल्पवयीन युवतींना मारहाण केल्याची घटना घडली. याबाबत कोमल कुलदीप पवार (वय ३३, रा. केंदूर, ता. शिरूर, जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली.
पोलिसांनी दीपाली विशाल पवार (वय ३४) व कार्तिक मोहन कवडे (दोघे रा. केंदूर, ता. शिरूर, जि. पुणे) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. कोमल पवार यांच्या घराशेजारी काही इसम दारू पिऊन धिंगाणा घालत होते. कोमल यांच्या दोन मुलींनी त्यांना येथे धिंगाणा का घालता, थांबा आम्ही पोलिसांना फोन करतो, असे म्हटले असता दिपाली पवार व कार्तिक कवडे या दोघांनी श्रुतिका पवार व तनिष्का पवार या दोघींना शिवीगाळ, दमदाटी करत दगडाने मारहाण करून जखमी केले. पुढील तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक विजय चौधर हे करत आहेत.