Thursday, September 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

सतीश वाघ हत्या प्रकरणातील दोन आरोपींना वाघोलीतून केले अटक; अन्य आरोपींचा शोध सुरू

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Tuesday, 10 December 2024, 22:04

पुणे : भाजपचे नेते विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचे फुरसुंगी फाटा येथून काल सकाळी (दि. ०९) पहाटेच्या सुमारास पाच जणांनी चारचाकी वाहनातून अपहरण केल्याची घटना घडली होती. या प्रकरणाचा तपास सुरू असताना यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीत सतीश वाघ यांचा काल मृतदेह आढळून आला. दरम्यान, या प्रकरणी पुणे पोलिसांनी १६ पथके आरोपींच्या शोधासाठी रवाना केली होती. त्याच दरम्यान पुणे पोलिसांनी दोन संशयित आरोपीना वाघोली परिसरातून ताब्यात घेतले आहे. पवन शर्मा आणि नवनाथ गुरसाळे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

दरम्यान, सतीश वाघ अपहरण आणि हत्या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार पवन शर्मा हाच असल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे. तर नवनाथ गुरसाळे हा ड्रायव्हरचं काम करतो. तर पवन शर्मा हा खाजगी कार्यालयांमध्ये कामे करायचा. आरोपींची आणि सतीश वाघ यांची वैयक्तिक दुश्मनी असल्याची प्राथमिक माहीती पोलीस तपासात समोर आली आहे. इतर फरार आरोपींची नावंही निष्पन्न झाली असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

ज्या गाडीतून सतीश वाघ यांचं अपहरण झालं होतं, तशा स्वरुपाच्या आठशे गाड्या पोलिसांनी आरटीओच्या मदतीने तपासल्या आहेत. पुणे, पिंपरी चिंचवड, बारामती, सोलापूर, बीड, अहिल्यानगर अशा एकूण आठ जिल्ह्यातील गाड्यांची माहिती घेण्यात आली. गाडीची माहिती आणि टेक्निकल डेटा यावरुन आरोपींचे लोकेशन पोलीसांनी शोधले.

सतीश वाघ हे काल पहाटेच्या सुमारास मॉर्निंग वॉक करीत असताना चारचाकी वाहनातून आलेल्या तीन चार जणांनी त्यांना गाडीमध्ये जबरदस्तीने बसवले आणि घेऊन गेले. ही घटना एका व्यक्तीने पहिली आणि त्यानंतर या घटनेची तक्रार वाघ यांच्या कुटुंबियांनी पोलिसांकडे केली. त्यानुसार आम्ही अपहरणाचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर विविध भागांत पथके रवाना करण्यात आली.

 

मात्र, काल सायंकाळच्या सुमारास सतीश वाघ यांचा मृतदेह यवत पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळून आला. तसेच आरोपींच्या शोधासाठी सोळा पथके रवाना केली असून या प्रकरणी आम्ही तांत्रिक दृष्ट्या देखील शोध घेत आहोत. त्याचबरोबर सतीश वाघ यांचे अपहरण केल्यानंतर आरोपींनी काही तासात तीक्ष्ण हत्याराने मारल्याचे प्राथमिक दृष्ट्या दिसून येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

 

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

दौंडमधील गाडेवाडीत एलटी लाईनवरून वीजचोरी! १ हजार ८६६ युनिटची चोरी उघड; गुन्हा दाखल

Wednesday, 2 September 2026, 22:56

दौंडमध्ये संतापाची लाट! पोलिसांना चकवा देणारा कथित ‘लव्ह जिहाद’ प्रकरणातील फरार आरोपी थेट पालिकेत; गटनेत्याच्या दालनात चहापान?

Wednesday, 2 September 2026, 22:38

पिंपरी-चिंचवड महापालिकेत अत्यंत संतापजनक प्रकार! हुंडाबळी गेलेल्या महिलेच्या शोकप्रस्तावावर बोलताना चक्क हसल्या उपमहापौर

Wednesday, 2 September 2026, 21:43

शरद पवारांच्या नावाचा आंबा आता बाजारात विकायला येणार! गोविंद बागेत ३ किलो वजनाच्या ‘शरद मॅंगो’ची लागवड; काय आहे वैशिष्ट्य?

Wednesday, 2 September 2026, 21:04

पुरंदर तहसील कार्यालयात लाचेचा पर्दाफाश! जमिनीच्या वादाचा निकाल लवकर लावण्यासाठी २५ हजारांची लाच घेणारा क्लार्क एसीबीच्या जाळ्यात

Wednesday, 2 September 2026, 20:15

शिवसेना कोणाची? शिंदेंनी बंड का केलं? वकिलांनी कोर्टात सगळंच सांगितलं; वाचा संपूर्ण युक्तिवाद…

Wednesday, 2 September 2026, 19:58
Next Post

सासवडयेथे गॅरेजला शॉर्टसर्किटने भीषण आग; ४ चारचाकी तर दोन दुचाकी जळून खाक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp