Pune News : सासवड, (पुणे) : कोडीत खुर्द (ता. पुरंदर) ग्रामपंचायत हद्दीत वीस हजार व्यावसायिक झाडांचे वृक्षारोपण करण्यात येणार आहे. त्यामुळे कोडीत खुर्द मधील महिला बचत गटांना उत्पन्न मिळेल अशी माहिती तेर पॉलिसी सेंटर संस्थापिका विनिता आपटे यांनी दिली. (Pune News)
टाटा मोटर्स पुणे, तेर पॉलिसी सेंटर पुणे, कोडीत खुर्द ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमानाने आषाढी एकादशी निमित्त २० हजार झाडांचे वृक्षारोपण करण्यास सुरुवात केली. यावेळी तेर पॉलिसी सेंटरच्या संस्थापिका आपटे यांनी मनोगत व्यक्त करताना दिली आहे.
यामध्ये आंबा, पेरू, चिकू, चिंच अशा झाडांचे वृक्षरोपण करण्यात येईल जेणेकरून यातून महिला बचत गटांना उत्पन्न मिळणार आहे. तसेच कोडीत खुर्द येथील जनावरांना चारा मिळावा या उद्देशासाठी दहा एकर मध्ये हत्ती गवत किंवा तस्सम जातीचे गवत लावून देण्यात येईल. तसेच सर्व २५ एकर जागेला कंपाऊंड करण्यात येणार आहे. झाडांना ड्रीपद्वारे पाणी देण्यात येणार आहे. (Pune News)
दरम्यान, सरपंच प्रसाद खैरे यांनी टाटा मोटर्स तेर पॉलिसी सेंटर तसेच उपस्थितांचे आभार मानले. उपस्थितांमध्ये सरपंच प्रसाद खैरे टाटा मोटर्स जनरल मॅनेजर प्रत्युष खरे तसेच त्यांचे सर्व सहयोगी तेर पॉलिसी सेंटर संस्थापिका विनिता आपटे सर्व सहयोगी प्रसाद माने सागर ग्रामपंचायत सदस्य विशाल कांबळे ग्रामस्थ हेमंत खैरे किरण खैरे सुरेश तळेकर आदी उपस्थित होते.