अक्षय टेमगिरे / रांजणगाव गणपती : शिरुर तालुक्यातील कारेगावच्या प्रभारी सरपंचपदी तुषार प्रकाश नवले यांची निवड झाली आहे. पुर्वीच्या सरपंच निर्मला शुभम नवले यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या सरपंच पदावर तुषार नवले यांची प्रभारी सरपंच म्हणुन निवड झाली आहे. सन २०२१ साली झालेल्या कारेगावच्या पंचवार्षिक ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये तुषार नवले हे आधी सदस्य म्हणुन निवडुन आले होते. त्यानंतर त्यांची उपसरपंच म्हणुन निवड करण्यात आली होती.
त्यानंतर आता कारेगावच्या सरपंच निर्मला नवले यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदावर योगायोगाने त्यांची सध्या प्रभारी सरपंच म्हणुन निवड झाली आहे. या निवडीनंतर कारेगाव ग्रामस्थांसह सगळीकडुन तुषार नवले यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
कारेगावच्या ग्रामस्थांनी मला आधी ग्रामपंचायत सदस्य म्हणुन संधी दिली. त्यानंतर उपसरपंच म्हणुन मला संधी मिळाली आणि आत्ता प्रभारी सरपंच म्हणुन मला संधी मिळाली आहे. या सर्व मिळालेल्या संधीच मी कारेगावच्या विकासासाठी ‘सोनं’ करणार, असे तुषार नवले यांनी बोलताना सांगितले आहे.