पुणे : बनावट बिले तयार करून ट्रॅव्हल मॅनेजरने कंपनीची ५६ हजारांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कंपनीच्या मॅनेजवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नीना सिंग (रा. विमानगर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या ट्रॅव्हल मॅनेजरचे नाव आहे. याप्रकरणी रविचंद्र टंगीराला (वय ४२ रा. विमाननगर) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना ८ नोव्हेंबर २०२३ ते २४ फेब्रुवारी २०२४ दरम्यानच्या काळात विमानगर येथील सॉलिटर बिझनेस हब येथील व्हॅरोक इंजिनियरिंग कंपनीत घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, नीना सिंग या व्हॅरोक इंजिनियरिंग कंपनीच्या ट्रॅव्हल मॅनेजर आहेत. नीना सिंगने पदाचा गैरवापर करून बनावट बिल तयार करून कंपनीची ५६ हजारांची फसवणूक केली आहे. तसेच हॉटेलच्या जेवणाचे १२ हजार ३९० रुपये बनावट बिल, विमाननगर येथील हॉटेलमध्ये न राहता त्याचे ४९ हजारांचे बनावट बिल तयार केले. तसेच कंपनीशी संबंधित नसणाऱ्या तिघांचे विमानाचे तिकीट काढून कंपनीची ४ लाख ७२ हजार ८९० रुपयांची फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्याचे फियदित नमूद केले आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक ढावरे करत आहेत.