शिक्रापूर : वरुडे (ता. शिरुर) येथील पांडुरंग मूरकुटे यांच्या शेतातील विद्युत प्रवाह खंडित झाल्याने त्यांनी याबाबतची माहिती विद्युत वितरणच्या कर्मचाऱ्यांना माहिती दिली. कर्मचाऱ्यांनी तेथे जात पाहणी केली असता त्यांना पंढरीनाथ काळे यांच्या शेतातील विद्युत रोहित्र चोरट्यांनी फोडून त्यातील तांब्याच्या पट्ट्या चोरून नेल्याचे समोर आले.
याबाबत विद्युत वितरण विभागाचे कर्मचारी सुरेश विठोबा पवार (वय ४३ रा. कान्हूर मेसाई ता. शिरुर जि. पुणे मूळ रा. आमदाबाद ता. शिरुर जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार विकास सरोदे हे करत आहेत.