पुणे : आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून सर्व राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. त्याचप्रमाणे पोलीस दलात देखील बदलांचे वारे वाहत आहेत. आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलीस दलातील तब्बल ३५ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. अनेक पोलीस अधिकाऱ्यांनी वजनदार पोलीस ठाणे मिळावे म्हणून फिल्डिंग लावली होती. पण अनेकांच्या पदरी निराशा पडली. मनपसंत पोलीस ठाणे मिळाल्यामुळे काही अधिकारी आनंदात आहेत. त्यामुळे ‘थोडी खुशी, थोडी गम’ असे वातावरण सध्या पहायला मिळत आहे. काही अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या बुधवारी (ता. ३१) रात्री झाल्या आहेत. तर अनेकांनी गुरुवारी (ता. १) पदभार स्वीकारले आहेत.
पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांचीही बदली झाली असून, त्यांनी येथील पदभार सोडण्यापूर्वी प्रभारी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. मंचर पोलीस ठाणे- अरुण ज्ञानदेव फुगे, पुणे ग्रामीण नियंत्रण कक्ष -बळवंत कुंडलिक मांडगे, आळेफाटा पोलीस ठाणे -सतीश भाऊसाहेब होडगर, ओतूर पोलीस ठाणे- लहू गौतम थाटे, शिक्रापूर पोलीस ठाणे दीपरतन गोरख गायकवाड, शिरूर पोलीस ठाणे- ज्योतीराम माणिक गुंजवटे यांच्या नियुक्त्या बुधवारी (ता. ३१) रात्री झाल्या.
बदली झालेल्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव, पदस्थापना झालेले पोलीस ठाणे (कंसात पूर्वीचे पोलीस ठाणे)
– पोलीस निरीक्षक
बापूसाहेब पोपट सांडभोर – आर्थिक गुन्हे शाखा (जेजुरी), भाऊसाहेब नारायण पाटील- जिल्हा वाहतूक शाखा (दौंड), बळवंत कुंडलिक मांडगे- नियंत्रण कक्ष (मंचर), हेमंत गणपत शेडगे – आर्थिक गुन्हे शाखा (यवत), प्रमोद अंबादास क्षीरसागर- सुरक्षा शाखा (शिक्रापूर), अरुण ज्ञानदेव फुगे- मंचर (नियंत्रण कक्ष), दीपरतन गोरख गायकवाड- शिक्रापूर (नियंत्रण कक्ष), महादेव नारायण वाघमोडे- रांजणगाव (नियंत्रण कक्ष), ज्योतीराम माणिक गुंजवटे- शिरूर (नियंत्रण कक्ष), नारायण शिवाजी देशमुख – यवत (नियंत्रण कक्ष), चंद्रशेखर मोहनराव यादव – दौंड (नियंत्रण कक्ष), गोरख कृष्णा गायकवाड- बारामती तालुका (नियंत्रण कक्ष), नवनाथ कोंडीबा मदने- पोलीस कल्याण शाखा (नियंत्रण कक्ष),संतोष श्रीमंत घोळवे- नियंत्रण कक्ष (नियंत्रण कक्ष), सतीश भाऊसाहेब होडगर- आळेफाटा (आर्थिक गुन्हे शाखा), किरण नामदेव अवचर – जुन्नर (माळेगाव पोलीस ठाणे), सुहास लक्ष्मण जगताप – लोणावळा शहर (जिल्हा वाहतूक शाखा), राजेश गणेश गवळी – राजगड (पोलीस कल्याण शाखा) , प्रभाकर माधवराव मोरे – परकीय नागरिक नोंदणी कक्ष (बारामती तालुका), सीताराम लक्ष्मण डूबल – नियंत्रण कक्ष (लोणावळा शहर)
– सहाय्यक पोलीस निरीक्षक
लहू गौतम थाटे- ओतूर (शिक्रापूर), नेताजी शहाजी गंधारे- पारगाव (स्थानिक गुन्हे शाखा), दीपक भाऊसाहेब वाकचौरे- जेजुरी (अर्ज शाखा), संदेश चंद्रकांत बावकर- भिगवण (यवत पोलीस ठाणे), नितीन हनुमंत खामगळ- वेल्हा (राजगड), बालाजी तुळशीदास भांगे- माळेगाव (जिल्हा वाहतूक शाखा बारामती शहर), योगेश विश्वनाथ लंगोटे- स्थानिक गुन्हे शाखा (लोणावळा ग्रामीण), राजकुमार काशिनाथ डुंणगे- वालचंदनगर (नियंत्रण कक्ष), संदीप लक्ष्मण साळुंखे- शिक्रापूर (नियंत्रण कक्ष), प्रवीण महादेव संपागे- यवत (नियंत्रण कक्ष), विवेकानंद दत्तात्रय राळेभात- इंदापूर (नियंत्रण कक्ष).
– पोलीस उपनिरीक्षक
पुंडलिक मारुती गावडे – इंदापूर (जेजुरी), प्रियंका दशरथ माने – अर्ज शाखा (सासवड). नामदेव लक्ष्मण तारडे – जेजुरी (नियंत्रण कक्ष), दिपाली बळवंत पाटील – लोणावळा शहर (नियंत्रण कक्ष).