Traffik :लोणी काळभोर, (पुणे) : जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळा यवतच्या पुढे जाऊनही शहर पोलिसांनी पुणे – सोलापूर महामार्गावर वाहने अडविल्याने हडपसर, पंधरा नंबर, कवडीपाट, थेऊर फाट्यावर वाहतूक अडविल्याने स्थानिक नागरिक प्रचंड त्रस्त झाले आहेत. (Traffik)
पोलिसांनी हि वाहने कासुर्डी टोलनाका परिसरात थांबविल्यास चालतील मात्र, शहर पोलीस व ग्रामीण पोलिसांनी दोघांनीही सोयीस्कर भूमिका घेतल्याने सोलापूरकडे जाणारी अनेक जड वाहने व स्थानिक वाहनांना वळविलेली वाहतूक सोयीस्कर नसल्याने ती जागेवरच अडकून पडली आहेत. (Traffik) पुणे सोलापूर महामार्गावरील थेऊर फाटा परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. त्यामुळे ही कोंडी वाढत जाऊन रात्री थेट हडपसर येथील पंधरा नंबर चौकापर्यंत गेली होती. (Traffik)
शाळा सुरू झाल्याने विद्यार्थी वाहतूक करणारी वाहने, कामगार, व्यावसायिक यांना ठिकठिकाणी कोंडीत अडकून पडावे लागत आहे. अनेक वाहने अंतर्गत रस्त्यावर घुसल्याने तिकडेही कोंडी होत आहे. सध्या हडपसर व लोणी काळभोर पोलीस ठाण्याकडून ठीकठिकाणी वाहतूक नियंत्रण कर्मचारी उभे करून नियंत्रणाचे काम केले जात आहे. मात्र, थेऊर फाट्यावर वाहतूक वळविल्याने त्या पुढील स्थानिक वाहने अडकून पडली आहेत. (Traffik)
शहर व ग्रामीण पोलिसांची हद्द..
पुणे सोलापूर महामार्गावरून वाहने हि शहर पोलिसांच्या थेऊर फाटा परिसरातून सोडली तर पुढे बंद पडलेल्या यवत टोलनाका परिसरात ग्रामीण पोलीस अडवीत आहेत. त्यामुळे वाहनचालकांनी एकाच जागेवर उभे राहणे पसंत केले आहे. (Traffik)
यवत पर्यंत जाणारी वाहने सोडण्याची विनंती करूनही पोलिसांकडून ती सोडली जात नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. या कोंडीत दोन रुग्णवाहिकाही अडकून पडल्या होत्या. पोलिसांनी पालखी पर्यंतच्या गावाजवळील स्थानिक वाहने सोडण्यास काही हरकत नाही. त्यामुळे मागील वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होईल. (Traffik)
सोलापूरकडे जाणारी वाहने रस्त्यावर उभी..
पुण्यावरून सोलापूरच्या बाजूने जाणारी आणखी जड वाहने हि थेऊर फाटा परिसरात एका जागेवरच उभी आहेत. त्यामुळे स्थानिक नागरिकांना पुढे जाण्यास अडथळा होत आहे. तसेच लहान मोठी तसेच स्थानिक वाहनेही अद्वोन ठेवल्याने वाहतूक कोंडीत आणखीनच भर पाडली आहे. (Traffik)