उरुळी कांचन : Traffice Update – उरुळी कांचन ते सासवड मार्गावरील शिंदवणे (ता. हवेली) ते वाघापूर (ता. पुरंदर) (Shindwane to Waghapur) या मार्गावरील (Transportation) वाहतूक (for 1 month) १ महिन्यासाठी बंद (route closed)करण्यात आली आहे. तरी नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. (Traffic Update)
शिंदवणे घाटमाथा येथील पुलाचे काम सुरु
मिळालेल्या माहितीनुसार, पीएन-२९ अंतर्गत तळेगाव ढमढेरे ते जेजुरी राष्ट्रीय मार्ग क्रमांक ११७ या रस्त्याचे मजबुतीकरण तसेच शिंदवणे घाटमाथा येथील पुलाचे काम सुरु आहे. त्यामुळे २४ मार्च ते २९ एप्रिल २०२३ या कालावधीत वाघापूर ते शिंदवणे मार्गावरील वाहतूक बंद करुन ती सासवड- पिसर्वे-टेकवडी-बोरीऐंदी आणि सासवड-वाघापूर चौफुला-माळशिरस-यवत या मार्गे वळविण्याबाबत आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.
दरम्यान, नागरिकांनी वाघापूर ते शिंदवणे मार्गावरील वाहतूक कोंडी तसेच संभाव्य अपघात टाळण्यासाठी पर्यायी मार्गांचा वापर करुन प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले आहे.
वाहतुकीच्या संदर्भात अधिक बातम्या वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
Pune News : कात्रज नवीन बोगद्यातून मुंबईकडे जाणारी वाहतूक सहा तास बंद
लोणी काळभोर वाहतूक शाखेच्या पोलिसांकडून उरुळी कांचन येथील गर्दीच्या ठिकाणी सूचना फलक..!
हडपसर येथील उड्डाणपूलावरील एका बाजुची वाहतूक तीन दिवसांसाठी बंद