लोणी काळभोर : पुणे येथील हार्बर सोसायटी या संस्थेकडून कदमवाकवस्ती व लोणी काळभोर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत वाहतूक सुरक्षा जनजागृती मोहीम मंगळवारी (ता.27) राबविण्यात आली आहे. नेशन चेंज मेकर मोहिमेची सुरवात पुणे-सोलापूर महामार्गावरील लोणी स्टेशन चौकात करण्यात आली आहे. अशी माहिती संस्थेचे प्रतिनिधी डॉ. अविनाश वाघमारे यांनी दिली आहे.
रस्ता सुरक्षा प्रतिबंधात्मक उपायांचा अवलंब केल्यास रस्ते अपघात बर्याच प्रमाणात टाळता येऊ शकतात. वाहन चालवताना किंवा बाइक चालवताना, सीट बेल्ट आणि हेल्मेट घालणे यासारख्या सुरक्षा खबरदारी वापरा. वाहन चालवताना सौंदर्य प्रसाधने, केस घालणे किंवा फोनवर बोलणे या सर्व गोष्टी टाळायच्या आहेत. नेहमी रस्त्याचे नियम पाळा. असे फलक दाखवून संस्थेच्या प्रतिनिधींनी लोणी स्टेशन चौकात जनजागृती केली.
दरम्यान, पुणे शहरातील वाढती वाहतूक, होणारी गर्दी व नागरिकांना सहन करावा लागणारा त्रास लक्षात घेता. वाहतूक नियमांची सर्रास पायमल्ली होतानाचे चित्र सर्वत्र दिसत आहे. परिणामी जीवघेणा अपघात, ट्रॅफिक जॅम व मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. याची जाणीव पूर्वक दखल घेत हार्बर सोसायटी संस्थे तर्फे स्वातंत्र्य दिनी (15 ऑगस्ट) नेशन चेंज मेकर ही वाहतूक सुरक्षा जनजागृती मोहीम सुरू केली आहे. हि मोहीम संपूर्ण पुणे शहर तसेच लगतच्या संपूर्ण परिसरात महिनाभर राबविण्यात येणार आहे.
पुढे बोलताना डॉ. अविनाश वाघमारे म्हणाले की, स्वातंत्र्य मिळाल्यापासून आतापर्यंत झालेल्या युद्धात आणि अतिरेकी हल्ल्यात मेलेल्यांपेक्षा अधिक लोक एका वर्षात झालेल्या रस्त्यावरील अपघातात मरण पावले आहेत. कल्पना करा की एखादे जंबो जेट विमान रोज 400 पेक्षा अधिक प्रवाशांना घेऊन भारतीय भूमीत कोसळले तर जेवढी जीवीत हानी होईल तेवढीच जीवीत हानी रस्त्यावरील अपघातात दररोज होते. अशी अधिकृत माहिती शासनाच्या पोर्टलवर उपलब्ध आहे.
रस्त्यावरील अपघातांची आकडेवारी…
-साधारणपणे दररोज 413 जण मरण पावतात
-दररोज 1,317 मरतात (प्रत्येक मिनीटाला एक)
-प्रत्येक तासाला 17 जण मरण पावतात
-दुचाकीच्या अपघातामध्यें 25 टक्के मृत्यू होतात
– सन 2016 सालात 1,50,785 लोकांचा मृत्यू झाले आहेत.
अपघातांची कारणे…
-रात्रीच्या वेळी प्रखर झोतात गाडी चालवली
-दारू पिऊन गाडी चालवली लाल दिव्याचे सिंगल चे उल्लंघन करणे
-अतिशय वेगाने गाडी चालवणे
-मोबाईल फोनवर बोलताना गाडी चालवणे
-अचानक रांग लेन बदलणे
-दोन व्यक्ती पेक्षा जास्त गाडीवर बसविणे
-प्रमाणाबाहेर माल भरणे,
आपण काय करू शकतो…?
हे करणे थांबवा
1. जास्त वेगाने गाडी चालवणे.
2. वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे.
3. धोकादायकपणे पुढची गाडी ओलांडून जाणे (ओव्हरटेक करणे)
4. दारू पिऊन गाडी चालविणे.
हे करा…
1. रहदारीचे नियम पाळने.
2. पादचारी आणि इतर रस्त्यावरील लोकांचा सन्मान करा.
3. सुरक्षितपणे आणि सावधानतेने वाहन चालवा.