पुणे: प्रजासत्ताक दिन आणि जोडून आलेल्या वीकेंडच्या सुट्टयामुळे अनेक जण आनंद घेण्यासाठी मुंबईच्या बाहेर पडत आहेत. त्यामुळे पुणे-सातारा रस्त्यावर वाहनांची गर्दी आहे. पुणे-सातारा लेनवर खेड-शिवापूर टोल नाक्यापासून सुमारे तीन किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.
प्रजासत्ताक दिन आणि त्याला जोडून शनिवार आणि रविवारची सुट्टी आहे. म्हणजेच तीन सट्टया जोडून आल्या आहेत. त्यामुळेच या सलग आलेल्या सुट्टयांचा आनंद घेण्यासाठी नागरीक मोठ्या संख्येने बाहेर पडले आहेत. त्यामुळेच आज सकाळ पासून पुणे सातारा रस्त्यावर कोकण तसेच गोवा आदी ठिकाणी जाणाऱ्या वाहनांची संख्या मोठी आहे. पुणे-सातारा रस्त्यावरील खेड-शिवापूर टोल नाक्यापासून पाठीमागे कोंढणपूर फाट्यापर्यंत म्हणजेच सुमारे तीन किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.
दुपारपासून रस्त्यावर वाहनांची गर्दी आहे. मात्र सकाळी अकरा वाजल्यानंतर वाहनांची गर्दी वाढली. कोंढणपूर फाटा ते खेड-शिवापूर टोल नाका हे अंतर पार करण्यासाठी वाहनांना सुमारे पंधरा ते वीस मिनिटे वेळ लागत होता.