पुणे : पुण्यातील कोरेगाव पार्क परिसराला पुणे कॅम्प परिसराशी जोडणाऱ्या साधू वासवानी उड्डाणपूल पाडण्यासाठी बंडगार्डन आणि कोरेगाव पार्क परिसरातील वाहतुकीमध्ये प्रायोगिक तत्त्वावर बदल करण्यात येणार आहेत. शनिवार १० फेब्रुवारीपासून या नव्या बदलांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. नवा बदल यशस्वी ठरल्यानंतर मार्च महिन्यात हा उड्डाणपूल पाडण्यात येणार असल्याची माहिती वाहतूक विभागाकडून देण्यात आली आहे.
कोरेगाव पार्क येथील साधू वासवानी रेल्वे उड्डाणपूल कमकुवत झाल्याने लवकरच त्या पुलाची पाहणी करून नव्याने बांधण्याचे नियोजित आहे. त्यानुसार पूल पाडण्यापूर्वी या भागातील वाहतुकीमध्ये काही बदल प्रायोगिक तत्त्वावर करण्यात आले होते. मात्र हे बदल व्यवहार्य ठरत नसल्याचे पुढे आले होते. त्यामुळे पुलाचे पाडकामही लांबणीवर पडले होते. त्यानंतर तातडीने नव्या बदलांबाबतचे आदेश वाहतूक पोलिसांकडून देण्यात आले आहेत.
असा असेल पर्यायी मार्ग?
- मोरओडा चौक ते ब्लू डायमंड हॉटेल चौक या दरम्यान साधू वासवानी पुलावरून हलक्या वाहनांसाठी एकेरी वाहतूक सुरू राहील
- आयबी चौक से सर्किट हाऊस चौक दरम्यान जनरल अरुण कुमार वैद्य मार्गावर एकेरी वाहतूक सुरु राहील
- मोरओडा चौकातून आयबी चौकाकडे जाण्यासाठी मोरओडा चौक सरळ सदन कमांड समोरून कौन्सिल हॉल चौकातून उजवीकडे वळण घेऊन जावे पीएमपी आणि अन्य खासगी बसना मोरओढा चौकातून सरळ काढून रस्त्यावरून डावीकडे वळावे
- तारोपोर रोड जंक्शन येथून उजवीकडे वळून ब्लू नाईल चौकात येऊन तेथून मंगलदास चौकात जाता येईल
- ब्लू डायमंड चौकातून साधू वासवानी पुलावर वाहनांना प्रवेश नसल्याने ब्लू डायमंड चोक मोबोज चौक एकेरी मार्गाने
मंगलदास चौक, आपको चौक, सर्किट हाऊस येथे जाता येईल