Sunday, August 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

साहित्यातून समाज सक्षम करण्यासाठी लेखणीची तलवार करायला हवी : महादेव जानकर यांचे प्रतिपादन

गणेश सूळby गणेश सूळ
Monday, 16 June 2025, 19:06

केडगाव : सध्याच्या काळातील शिक्षण व्यवस्था, जातीयता, विषमता आणि विकासाच्या नावाने रंगवलेले चित्र समाजाच्या हिताचे नाही. जोपर्यंत शेतकऱ्यांची पोरं सत्तेत येत नाही, तोपर्यंत पिळवणूक थांबणार नाही. साहित्यातून समाज मन घडविण्यासाठी लेखणीची तलवार संघर्षासाठी सज्ज ठेवली पाहिजे,असे प्रतिपादन राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी केले आहे.

राज्यस्तरीय चौथे भीमथडी मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन महादेव जानकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी सुप्रसिद्ध कवी म.भा.चव्हाण होते. अखिल भारतीय मराठी साहित्य संशोधन परिषद व भीमथडी मराठी साहित्य प्रतिष्ठान यांच्या वतीने राज्यस्तरीय चौथे भीमथडी मराठी साहित्य संमेलनाचे दि.१४ व दि.१५ रोजी दोन दिवशीय आयोजन करण्यात आले होते. स्वागताध्यक्षपदी प्रमोद ढमाले, निमंत्रक सुयश देशमुख व सहनिमंत्रक मोहन जाधव हे होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार संभाजीराव कुंजीर, सागर फडके, भाऊसाहेब फडके, संजय सोनवणे, कैलास शेलार, दत्तात्रय डाडर, बदाम माकर आदी उपस्थित होते.

भीमथडी मराठी साहित्य संमेलनाची सुरवात श्री बोरमलनाथ महाराजांना भीमेच्या पाण्याचा जलाभिषेक व ग्रंथदिंडी काढून करण्यात आली. ग्रंथदिंडीत कवी, लेखकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. उद्घाटन समारंभ, पुरस्कार वितरण, कथाकथन, नाट्यप्रयोग, परिसंवाद, कलारंग व सांस्कृतिक कार्यक्रम, कविसंमेलन व समारोप असे भरगच्च कार्यक्रमाने साहित्य संमेलन दोन दिवशीय रंगतदार झाले.

महादेव जानकर म्हणाले, सध्याची सामाजिक परिस्थिती भयावह असून जनता संभ्रमित आहे. नीती, तत्वाची चाड राहीली नाही. भीमथडी मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने कवी, लेखक, साहित्यिक यांना एक चागलं विचारपीठ निर्माण झाले आहे. भीमथडीच्या मातीतून प्रेरणा घेऊन दिल्लीच्या तख्ताला धडक दिली. हा प्रेरणा देणारा इतिहास पुन्हा एकदा घडवावा लागेल. पाच एकर क्षेत्रावर जागतिक दर्जाचे मराठी साहित्य भवन उभारण्यासाठी मी साहित्य परिषदेच्या सोबत आहे. साहित्यिकांना न्याय देण्यासाठी सरकार दरबारी प्रयत्न करीन. तसेच यावेळी भीमथडी मराठी साहित्य संमेलनास एक लाख रुपये निधी देण्याचे कबूल केले.

 

संमेलनाध्यक्ष म. भा.चव्हाण म्हणाले, ”सत्याची कास धरत नवीन लेखकांनी लेखन करायला हवे. विज्ञानाच्या कसोटीवर निर्माण झालेले साहित्य जिवंत राहते. राज्याच्या अनेक भागातून साहित्यिक भीमथडी साहित्य संमेलनामध्ये सहभगी झाले होते, अशा संमेलनांना शासनाने आर्थिक मदत करण्याची गरज आहे.”

यावेळी बाळासाहेब मुळीक, सुशांत जगताप, अरविंद जगताप, रामचंद्र नातू, राजाभाऊ जगताप, रवींद्र खोरकर, संदिप सोनवणे,विठ्ठल थोरात, आनंदा बारवकर, डॉ.अशोकराव जाधव आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन रवि पवार व आभार दिपक पवार यांनी मानले.

गणेश सूळ

गणेश सूळ

ताज्या बातम्या

समृद्धी महामार्गावर गॅस पाईपलाईनला मोठी गळती! दुर्गंधीने परिसरात खळबळ; वाहनांच्या लांबच लांब रांगा

Saturday, 29 August 2026, 23:14

मोठी बातमी! मुंबई उच्च न्यायालयाची लिपिक भरती परीक्षा रद्द; नव्या तारखेची लवकरच घोषणा

Saturday, 29 August 2026, 22:54

पुण्यात आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा मोठा विजय! 17 दिवसांच्या उपोषणानंतर सरकार झुकलं; धडाधड GR जारी

Saturday, 29 August 2026, 22:39

धबधब्यावरचा आनंद ठरला अखेरचा!पाय घसरला अन् तरुणी वाहून गेली; दुर्दैवी मृत्यू

Saturday, 29 August 2026, 21:39

पोल्ट्री आणि पशुपालकांच्या न्याय्य हक्कासाठी 1 सप्टेंबरला पुण्यात मूक मोर्चा: GR असूनही अंमलबजावणी का नाही?

Saturday, 29 August 2026, 21:24

खाजगी क्लासला फाटा; स्व-अभ्यासाच्या जोरावर ऋषिकेश बेंद्रे राज्यात प्रथम!

Saturday, 29 August 2026, 20:16
Next Post

चेक बाउन्स प्रकरणी एक वर्षाची कैद अन् रोख दंड; आरोपीची येरवडा कारागृहात रवानगी...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp