पुणे : महाराष्ट्रात विधानसभेची निवडणुक चांगलीच रंगात आली आहे. राजकीय पक्षांकडून उमेदवारांची चाचपणी घेऊन जागा वाटपाचा काम सुरु आहेत. या जागावाटपात महाविकास आघाडीकडून पंढरपूर, मिरज, सांगोला, परांड्यासह दिग्रस विधासभा मतदार संघात 5 जागांवर दोघांना तिकीट जाहीर केले आहे. त्यामुळे या ५ जागांसाठी महाविकास आघाडीचा कोणता फॉर्म्युला आहे. हे अद्याप समोर आला नसला तरी सर्व ठिकाणच्या उमेदवारांनी निवडणूक लढविण्यासाठी जोरदार तयारी सुरु केली आहे.
या निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून 102, शिवसेनेकडून 96 तर राष्ट्रवादीने 87 जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत. तर 5 जागांवर महाविकास आघाडीकडून दोघांना तिकीट देण्यात आले आहे. ऊर्वरीत 8 या जागा मित्र पक्षांसाठी सोडल्या असल्याचे दिसून येत आहे. मात्र, शेवटच्या क्षणापर्यंत महाविकास आघाडीतील जागा वाटपाचा तिढा सुटलेला नाही. कारण महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी 5 ठिकाणी दोन उमेदवार दिले आहेत.
दरम्यान, महाविकास आघाडीकडून पंढरपूर, मिरज, सांगोला, परांड्यासह दिग्रस या विधानसभा मतदार संघात १० उमेदवार उभे केले आहेत. या ठिकाणचा कोणता उमेदवार निवडणूक लढणार अथवा माघार घेणार हे अद्याप समोर आलेले नाही. त्यामुळे महाविकास आघाडीच्या ५ जागांबाबत राज्यात जोरदार चर्चा रंगली असून उमेदवारीची माळ नेमकी कोणाच्या गळ्यात पडणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
महाविकास आघाडीमध्ये ज्या ठिकाणी दोन पक्षांनी अर्ज भरले आहेत..
मिरज :
- शिवसेना ठाकरे गट – तानाजी सातपुते
- काँग्रेस – मोहन वनखंडे,
सांगोला :
- शिवसेना ठाकरे गट – दीपक आबा साळुंखे
- शेकाप – बाबासाहेब देशमुख
दक्षिण सोलापूर :
- काँग्रेस – दिलीप माने
- शिवसेना ठाकरे गट – अमर पाटील
पंढरपूर :
- काँग्रेस – भागीरथ भालके
- राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष – अनिल सावंत
परांडा :
- शिवसेना ठाकरे गट – रणजीत पाटील
- राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष – राहुल मोटे
दिग्रस :
- शिवसेना ठाकरे गट – पवन जैस्वाल
- काँग्रेस – माणिकराव ठाकरे