बापू मुळीक / सासवड : पुरंदर -हवेली विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार विद्यमान आमदार संजय जगताप, तर महायुतीकडून भाजपचे विजय शिवतारे व अजित पवार गटाचे संभाजी झेंडे हे मैदानात उतरले आहेत. त्यामुळे पुरंदर- हवेलीमध्ये तिरंगी लढत पाहण्यास मिळणार आहे. दरम्यान, यामध्ये आत्तापर्यंत विद्यमान आमदारांच्या प्रचाराच्या फेऱ्या चांगल्या पद्धतीने पूर्ण झाल्या आहेत.
तर महायुतीमध्ये आजच दोन्ही उमेदवार एकमेकांसमोर उभे असल्याने महायुतीत भेदाभेद असल्याचे पहावयास मिळाले आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवारांचे सध्या तरी पारडे जड आहे. तर महायुतीमध्ये मतांची जुळवा जुळव होणार का? हा प्रश्न उभा आहे. त्यामुळे पुरंदर-हवेली मतदारसंघात कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
उमेदवारांची नाव व पक्षनिहाय चिन्ह पुढील प्रमाणे :
उदय कुमार वसंतराव जगताप – अपक्ष – स्टेसथोस्कोप
सुरेश बाबुराव वीर – अपक्ष – ग्रामोफोन
महादेव साहेबराव खेंगरे – अपक्ष – पेट्रोल पंप
अतुल महादेव नांगरे – अपक्ष – कढई
संभाजी सदाशिव झेंडे – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – घड्याळ
विजय सोपानराव शिवतारे – शिवसेना – धनुष्यबान
संजय चंद्रकांत जगताप – काँग्रेस – पंजा
उत्तम गुलाब कामठे – संभाजी ब्रिगेड पार्टी – ट्रमपेट
शेखर भगवान कदम – अपक्ष – विहीर
विशाल अरुण पवार – अपक्ष – सितार
सुरज संजय भोसले – बहुजन समाज पार्टी – हत्ती
अनिल नारायण गायकवाड – अपक्ष लिफाफा
उमेश नारायण जगताप – महाराष्ट्र नवनिर्माण सेना – रेल्वे इंजिन
संजय शहाजी निगडे – राष्ट्रीय समाज पक्ष – शिट्टी
कीर्ती शाम माने – वंचित बहुजन आघाडी – गॅस सिलेंडर
सुरत राजेंद्र घोरपडे – महाराष्ट्र स्वराज्य पक्ष – पेनाची निब सात किरणासह