लोणी काळभोर: रस्ता ओलांडणाऱ्या मुलीला भरधाव वेगाने आलेल्या दुचाकीने धडक दिल्याची घटना कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील एचपी कंपनीच्या समोर शनिवारी (ता.13) साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात एमआयटी शिक्षण संकुलात शिक्षण घेणारे तीन विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत.
साफल्य सुनील कुजणारे (वय २१), अथर्व राजेंद्र पाटील (वय 20, दोघेही सध्या रा. लोणी काळभोर, ता. हवेली. मूळ रा. नागपूर) व सुमेधा विलास देहाणकर (वय-19, सध्या रा. कदमवाकवस्ती, ता. हवेली, मूळ रा. नाशिक) अशी जखमी झालेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, साफल्य कुजणारे व अथर्व पाटील हे दोघे लोणी काळभोर येथील एमआयटी शैक्षणिक संकुलात इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत आहेत. तर सुमेधा देहाणकर या सुद्धा त्याच संकुलात बी.टेक शिक्षण घेत आहेत.
साफल्य कुजणारे व अथर्व पाटील हे दोघे जेवणासाठी कोरेगाव पार्क परिसरात गेले होते. जेवण आटपून लोणी काळभोरला दुचाकीवरून माघारी निघाले होते. पुणे-सोलापूर महामार्गावरून जात असताना त्यांच्या दुचाकीची व सुमेधा देहाणकर यांच्या दुचाकीची जोरदार धडक झाली. या अपघातात तिघेही गंभीर जखमी झाले.
या घटनेची माहिती मिळताच, लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक किरण धायगुडे व पोलीस अंमलदार सागर कदम तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तिन्ही जखमींना नागरिकांच्या मदतीने लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तिघांवरही विश्वराज हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून, त्यातील अथर्व पाटील याची प्रकृती गंभीर आहे. तरी पुढील तपास लोणी काळभोर पोलीस करत आहेत.
या घटनेची माहिती मिळताच, लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक किरण धायगुडे व पोलीस अंमलदार सागर कदम तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तिन्ही जखमींना नागरिकांच्या मदतीने लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तिघांवर ही विश्वराज हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून त्यातील अथर्व पाटील याची प्रकृती गंभीर आहे. तरी पुढील तपास लोणी काळभोर पोलीस करीत आहेत