–सागर जगदाळे
भिगवण : स्वामी चिंचोली(ता.दौंड) जवळ पुण्याहून विजयवाडा आंध्रप्रदेशला निघालेल्या कार गाडीने पाठीमागून ट्रेलर गाडीवर जोराची धडक दिल्याची घटना घडली आहे. ही घटना आज (दि.21 ऑक्टोबर) सकाळी साडेसात वाजता घडली आहे.
स्वाती उपाला, फनी कुमार उपाला, हंशल उपाला अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत.
या अपघातात गाड्यांची झालेली धडक इतकी जोराची होती की, यात गाडीचा पुढील भाग पूर्णपणे चक्काचूर झाला आहे. यात तीनजण किरकोळ जखमी झाले आहेत. कार गाडी ट्रेलरला पाठीमागून आत घुसल्यामुळे ती ट्रेलरला अडकून 15 ते 20 फूट ओढत गेली. जखमींमध्ये एका महिलेचा समावेश आहे.
अपघाताची माहिती मिळताच आपुलकीची सेवा ॲम्बुलन्स द्वारे जखमींना रावणगाव येथील दवाखान्यात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.