पिंपरी (पुणे) : भांडणाच्या रागातून सहा जणांनी मिळून दोघांवर कोयत्याने वार करत त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना रविवारी (दि. ८) सायंकाळी सात वाजता आळंदी येथे घडली. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. नागेश बालाजी कांबळे (वय १९, रा. कुरुळी, ता. खेड), आदित्य तुकाराम सातपुते (वय २२), विश्वजित दामोदर कदम (वय २०, दोघे रा. आळंदी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
त्यांच्यासह महेश पितळे आणि इतर दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विठ्ठल दौलत गुट्टे, (वय २४, रा. आळंदी), बालाजी लिंबोळे अशी जखमींची नावे आहेत. विठ्ठल गुट्टे यांनी सोमवारी (दि. ९) आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.