पिंपरी (पुणे) : पूर्ववैमनस्यातून तीन अल्पवयीन मुलांनी मिळून सराईत गुन्हेगारावर गोळीबार केला. यामध्ये एक गोळी खांद्याला चाटून गेल्याने तरुण किरकोळ जखमी झाला. ही घटना मंगळवारी (दि. २३) रात्री साडेअकराच्या सुमारास तळेगाव दाभाडे येथे घडली. आदित्य गणेश भेगडे (वय २७, रा. भेगडे आळी, तळेगाव दाभाडे) असे जखमी तरुणाचे नाव आहे. तर तीन अल्पवयीन मुलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी सांगितले की, भेगडे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर दोन गुन्हे दाखल आहेत. तर आरोपी हे सुद्धा गुन्हेगार्र पार्श्वभूमीचे आहेत. सहा महिन्यापूर्व भेगडे आणि मुख्य अल्पवयीन आरोप यांचे एकमेकांकडे पाहण्यावरून वार झाले होते. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.