पुणे : पुण्यातील जांभुळवाडी येथील माऊली बिल्डिंगमध्ये भर दिवसा तीन पत्तीचा जुगार रंगला होता. या घटनेची माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलिसांनी येथे छापा घालून १७ जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून १ लाख १६ हजार ९७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. हा प्रकार जांभुळवाडी येथील माऊली बिल्डिंगमध्ये रविवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडला आहे.
किरण गणपत डिंबळे (वय-३५, रा. पर्वती), रोहिदास बाळु गोरड (वय-४३, रा. पर्वती), हर्षद थोरवे (वय-२४, रा. शुक्रवार पेठ), दत्ता रघुनाथ जोगी (वय-३२, रा. कात्रज), भिकाजी कापुरे (वय-६३, रा. धनकवडी), विराज पाटील (वय-४५, रा. कात्रज), मुनावर वजीर शेख (वय-४०, रा. कात्रज), वसंत करसन वाघ (वय-४६, रा. शिवणे), योगेश घुमक (वय-३५, रा. सिंहगड रोड),धमेंद्र रघुनी सिंग (वय-३९, रा. हडपसर), दत्ता वसंत सितप (वय-५२, रा. नर्हे), राजेश उत्तेकर (वय-५३, रा. धनकवडी), इम्रान दलाल (वय-३६, रा. कात्रज), लक्ष्मण मानकर (वय-५३, रा. धनकवडी), किशोर सातपुते (वय-३८, रा. दांडेकर पुल), साहिल इब्राहिम साठी (वय-२३, रा. धनकवडी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्मण मानकर याने आरोपींना तीन पत्ती जुगार खेळण्यासाठी जागा उपलब्ध करुन दिली होती. किशोर सातपुते हा स्वत:च्या फायद्यासाठी हा जुगार अड्डा चालवित होता. इब्राहिमने जुगाराचे साहित्य पुरविण्याचे काम केले व जुगार खेळणार्यावर देखरेख करण्याचे काम करत होता.
या ठिकाणी जुगार खेळला जात असल्याचे माहिती मिळाल्यानंतर भारती विद्यापीठ पोलिसांनी छापा टाकला. यावेळी १५ पत्त्याचे कॅट, १७ मोबाईल, रोख १९ हजार ९७० रुपये असा १ लाख १६ हजार ६२० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मोहन कळमकर करीत आहेत.