पुणे : विद्यापीठात भरमसाठ वाढलेल्या शुल्कवाढीसंदर्भात विद्यार्थ्यांचे भर पावसात सलग तीन दिवस घंटानाद करून आंदोलन करत होते. आंदोलनाची दाखल घेऊन विद्यापीठ प्रशासनाने विद्यार्थ्यांना सर्व मागण्यांचे लेखी आश्वासन दिले आहे.
गेल्या तीन दिवसांपासून विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समितीने आंदोलनाला सुरुवात केली होती. या विद्यार्थ्यांना भेटण्यासाठी विद्यापीठ प्रशासनातर्फे प्र-कुलगुरू संजीव सोनवणे आणि कुलसचिव प्रफुल पवार यांनी भेट घेतली. यावेळी त्यांनी समितीतील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. तसेच शुल्कवाढीसंदर्भात समितीशी चर्चा करून लवकरच शुल्कवाढ मागे घेऊ, असे लेखी अश्वासनाद्वारे कळविले आहे.
भर पावसात सुरू असलेल्या आमच्या सर्व आंदोलकांचे हे यश आहे. सर्व मागण्या मान्य झाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. ही शुल्कवाढ रद्द झाल्यामुळे अनेक गोर-गरिबांच्या मुलांचे होणारे आर्थिक शोषण थांबणार आहे. असे विद्यार्थ्यांनि सांगितले आहे. दरम्यान, कृती समितीच्या वतीने पोलीस, विद्यापीठ प्रशासन, सर्व सहभागी विद्यार्थी, राजकीय संघटना आदींचे आभार मानले आहे.