पुणे : पुणे जिल्ह्यातून महिलांवरील अत्याचार तसेच सोशल मिडीयावर बदनामीबाबत अनेक गुन्हे सध्या समोर येताना दिसत आहेत. काही घटना ताज्या असतानाच आता आणखी एक इन्स्टाग्रामवर अश्लील मेसेज करुन बदनामी केल्याचा प्रकार समोर आला आहे. इन्स्टाग्रामवर रिल पाहत असताना एका विवाहित महिलेला अश्लील मेसेज करुन बदनामी करण्याची धमकी देण्यात आली.
याप्रकरणी इन्स्टाग्राम अकाउंट धारकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी लोणीकंद येथे राहणाऱ्या महिलेने सोमवारी (दि.२२) लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला त्यांच्या मोबाईलवर इन्स्टाग्रामवर रिल बगत बसल्या होत्या. त्यावेळी सुरुवातीला आरोपीने मेसेज करण्यास सुरुवात केली. त्यानंतर आरोपीने अश्लील मेसेज करुन स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. तसेच तुझे फोटो आणि कॉल रेक़र्डींग माझ्याकडे आहे. मी ते तुझ्या पतीला पाठवून तुझी बदनामी करण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास लोणीकंद पोलीस करत आहेत.